IMPIMP

Pune Police News | पुणे पोलीस दलातील ‘त्या’ तीन कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Police News | पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळून गेल्याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांची एक वर्षासाठी वेतनवाढ स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले होते. निलंबन कालावधी कर्तव्यकाळ धरण्याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस उपायुक्त मुख्यालय रोहिदास पवार यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करुन पोलीस उपायुक्तांनी तिन्ही कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ स्थगितीचा आदेश ‘जसा आहे तसाच’ ठेवला आहे.

पोलीस हवालदार संभाजी रघुनाथ गायकवाड, पोलीस नाईक महेश गंगाराम धोत्रे, पोलीस शिपाई विशाल तानाजी कदम अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. वारजे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने 18 सप्टेंबर 2021 रोजी पलायन केले होते. त्यावेळी कर्तव्यावर हजर असणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे निलंबन रद्द करुन त्यांना पुन्हा शासकीय सेवेत घेण्यात आले होते.

पोलीस कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करुन वार्षिक वेतनवाढ दोन वर्षासाठी स्थगित करण्याची शिक्षा आदेशाद्वारे देण्यात आली होती. या आदेशाविरोधात पोलीस कर्मचाऱ्यांनी अपिल केले होते. अपीलाच्या आदेशानुसार गायकवाड, धोत्रे आणि कदम यांचे एक वर्षासाठी वेतनवाढ स्थगित करण्यात आले होते.

दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यांनी निलंबन कालावधी कार्तव्यकाळ धरण्याबाबत विनंती अर्ज केला होता. या अर्जाची, विभागीय चौकशी अंतिम आदेशाचे तसेच अपीलावरील आदेशाचे अवलोकन करुन पोलीस उपायुक्त मुख्यालय रोहिदास पवार यांनी निलंबन कालावधी ‘जसा आहे तसाच’ धरण्यात येईल असे आदेशात नमूद केले आहे.

महावितरण ‘या’ तारखेपासून बसवणार ‘स्मार्ट प्रिपेड मीटर’, रिचार्ज संपले की वीज बंद! जाणून घ्या सविस्तर

Related Posts