IMPIMP

Rain in Maharashtra | आठवडाभर पाऊस घेणार विश्रांती; हवामान विभागाचा अंदाज

by nagesh
Rain in Maharashtra | pune news signs of rain re activating across the state

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Rain in Maharashtra | राज्यात मुसळधार पडणाऱ्या पावसाने (Rain in Maharashtra) गेल्या दिवसापासून दडी मारली आहे. असे असले तरी कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्रातील (Central Maharashtra) घाटमाथ्यापैकी कोल्हापूरसह आसपासच्या भागात मुसळधार पाऊस होत आहे. परंतु शुक्रवारपासून पुढील किमान आठवडाभर तरी पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. अनुकूल वातावरण नसल्याने पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात आणखी आठवडाभर पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज ही वर्तवण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

या राज्यात पावसाची विश्रांती

मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थानमध्ये (Rajasthan) सुरू असलेला पावसाचा जोर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओसरण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये 7 ऑगस्टपासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे.तर ओडिशा वगळता मध्य भारत, महाराष्ट्र (Maharashtra), गुजरातमध्ये (Gujarat) पुढील आठवडाभर पावसाची दडी कायम राहील.

 

 

किनाऱ्यालगत जोरदार वारे

राज्यातील काही भागात पावसाने दडी मारल्याने ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत जोरदार वारे वाहत असून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गसह, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

राज्यात 24 तासांतील पाऊस (मिलिमीटरमध्ये)

वसई 31, कर्जत 37, माथेरान 52, रोहा 36, चिपळूण 38, गुहागर 47, लांजा 42, मंडणगड 42, राजापूर 38, रत्नागिरी 47, संगमेश्वर 61, दोडामार्ग 61, कणकवली 50, कुडाळ 34, मुलदे 40, रामेश्वर 35, वैभववाडी 40. ठाणे 41, भिवंडी 31, उल्हासनगर 50. गगनबावडा 101, पन्हाळा 30, राधानगरी 40, शाहूवाडी 30, इगतपुरी 67, महाबळेश्वर 95, पाटण 35.

 

 

Web Title : rain in maharashtra | A week of rain rest; Meteorological Department Forecast

 

हे देखील वाचा :

Pavana Dam | पिंपरी चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली; पवना धरणात 92.81 टक्के पाणीसाठा

Supreme Court | त्रास देणे हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नाही

RBI Monetary Policy | RBI पॉलिसीच्या या प्रमुख गोष्टी तुम्ही आवश्य जाणून घ्या, रेपो रेटमध्ये बदल केला का? वाचा सर्वकाही

Traffic signal | ठाण्यात सिग्नल अभावी वाहतुकीचा खोळंबा; बिल न भरल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित

 

Related Posts