IMPIMP

भारतावरील (छत्र) स्तूप : धम्माचा प्रबोधनकाळ (पुनरुज्जीवन) : लेखक – बिक्रम दांडिया

by sachinsitapure

ई. सन १२०० सालचा, नालंदा महाविहाराच्या विध्वंसाचा, लुटारू अफगाणांच्या छावणीतील विजय-उन्माद हा काहीसा अल्पजीवी अदूरदर्शी ठरला. मध्यदेशातील (उत्तरभारतातील मध्य भाग) तेथे महाविहारात राहणाऱ्या भिक्षूचे निर्घृण हत्याकांड, आणि तेथील ग्रंथालयातील ६ महीने धुमसणारी पुस्तकांची होळी, हा धम्मावरील शेवटचा मरणप्राय आघात होता असा समज आहे. परंतु तो अंतिम आघात नव्हता. परंपरेतील भाकितानुसार बुद्धाच्या परिनिर्वाणा च्या २५०० वर्षांनंतर ‘धम्म’ पुनश्च एकदा उदय पावणार होता. नालंदातील विध्वंस हा केवळ त्या पूजनीय परंतु जीर्ण वृक्षाच्या फांद्या सपासप छाटण्यासारखा होता, की ज्याला पुनश्च १९ व्या शतकाच्या पूर्वाधात ब्रिटिशकालीन भारतात अंकुर, धुमारे फुटणार होते.

सुमारे एक हजार वर्षाच्या विस्मृतीनंतर, जेम्स प्रीन्सेप, की जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत कनिष्ठ कर्मचारी होते, यांना ब्राम्ही लिपीचा उलगडा झाल्यानंतर तो ‘धम्माच्या’ प्रबोधनकाळासाठी, पुनरुज्जीवनासाठी सहाय्यक ठरला. पंजाब आणि अफगाणिस्तानातील मॅसेडोनीयन राजांच्या पाठीमागे राहिलेल्या ब्राम्ही आणि ग्रीक या द्विभाषिक नाण्यांची त्याच्या भाषानुवादाला मदत झाली. प्रीन्सेपच्या नव-नवोन्मेषशाली पाऊल खुणांजवळच, अनेक पिढ्यांच्या विस्मृतीच्या कठीण कवचाला भेदून, हळूहळू कोमल अंकुर, बुद्धाच्या जीवनासंबंधातील ठिकाणांच्या रूपाने, द्रुग्गोचर होऊ लागला.

सम्राट धम्म अशोकाने मागे ठेवलेले अनेक शीलालेख समजण्यात यश आले, हे ब्राह्मी लिपी उलगडल्यामुळे मुळे शक्य झाले, तरी १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातच त्याचे (अशोकाचे) नावही उजेडात आले. आणि त्याचे नाव रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल सारख्या पाश्चिमात्य विद्वत संस्थाच्या वलयांकित दालनापासून ई. स. १९१५ पर्यन्त भारतीय लोकांच्या कौतुकापासून दूर राहिले. वसाहतवादी राजवटीत राहणाऱ्या लोकांसाठी ‘त्यांचा एक सामर्थ्यशाली भारतीय राजा, धम्मानुसारी होता, की ज्याने कमीतकमी ब्रिटिशांच्या ताब्यातील भारताएवढ्या भूभागावर राज्य केले होते’, हे अविश्वसनीयरित्या हायसे वाटणारे होते. आणि त्याहीपुढे, त्या राजाचा वारसा येणाऱ्या शतकात महत्वपूर्ण भूमिका निभावणार होता.

यादरम्यान सुमारे सन १९१२ मध्ये नवी दिल्लीतील त्यावेळच्या ‘गव्हर्नमेंट हाऊस’ की जे आता ‘राष्ट्रपति भवन’ (प्रेसिडेंशियल मॅनशन) म्हणून ओळखले जाते, त्याच्या आराखड्याची (डिझाईन) प्राथमिक जबाबदारी ही स्थापत्यविशारद सर एडविन लुटीएन्स यांना दिली गेली होती. विन्स्टन चर्चिलने बंकीङ्ग हॅम पॅलेस पेक्षा मोठी असल्याने नव्या इमारतीचा ‘व्हाईस रिगल पॅलेस’ असा उल्लेख केला. ब्रिटिश प्रवासी लेखक रॉबर्ट बायरन यांनी या अति-भव्य इमारतीचे वर्णन करताना सन १९३१ मध्ये अशी नोंद केली आहे की, “जर प्रजेच्या संख्येनुरूप सामर्थ्य जोखले, तर त्यात राहणाऱ्या सर्वात सामर्थ्यशाली माणसाच्या दृष्टीने अत्यंत सुंदर प्रासादाचे (राजवाड्याचे) हे नियोजन सुयोग्य आहे – की विस्ताराने एवढा मोठा, इतका सुनियोजित, इतका रुबाबदार आणि तरीही अत्यंत सुंदर प्रासाद (राजवाडा) कधीही झाला नाही.”(१)

सर एडविन लुटीएन्स यांना सर्व वस्तु भारतीय असण्याबाबत अत्यंत नावड आणि असहिष्णुता होती.(२). दरम्यान त्यांच्या पत्नी, लेडी एमिली या, १५ वर्षीय भारतीय जिद्दू कृष्णमूर्ती हे त्यांचे पूजनिय असण्याबद्दल सुखी-समाधानी होत्या.(३). तरीदेखील त्यांनी, २० व्या शतकातील जगातील सर्वात लक्षणीय इमारत, असा कोणी अंदाज बांधू शकेल, अशा प्रकारचा आराखडा तयार केला. आणि त्याच्या सर्व पूर्वग्रहांशिवाय (आणि राज्यकर्त्या व्हाईसरॉय लॉर्ड हऱ्डिंग यांनी त्या दिशेने सुचवूनही) त्यांनी भारताच्या गत वैभवाच्या स्मारकासाठी त्यात एक अभिमानास्पद स्थान राखून ठेवले, हा उत्कृष्ट अशोक स्तूप रूपी छत्र (मुकुट) चढवून, की जी सांचीच्या स्तूपाची प्रतिकृति होती, त्याच्या सभोवती साजेसा ‘अशोकन’ – ‘वर्तुळाकार कुंपणरूपी साज’ तयार केला. याशिवाय ‘आर्किटेक्चर ऑफ द राष्ट्रपती भवन’ या विषयावरील ‘द डोम ओव्हर इंडिया’ हे अमन नाथ यांचे पुस्तक लुटीएन्स यांच्या आर्किटेक्चरल ड्रॉईंग्जच्या सहाय्याने हे उकलून दाखवते की, ‘इमारतीला आधार देणारे स्तंभ हे कसे प्रेरित झालेले आहेत’, की जे अशोकाने त्याच्या राज्यात सर्वदूर धम्माच्या महत्वाच्या ठिकाणांचा निर्देश करण्यासाठी उभारले होते.

ब्रिटिशांनी, की ज्यांचा फास भारताभोंवती घट्ट आवळला जात होता, ई. स. १९११ मध्ये साम्राज्याची राजधानी कलकत्ता येथून दिल्ली येथे हलविण्याची मोठी अपेक्षा ठेवली होती, आणि तीही नवीन व्हाईस रिगल पॅलेस येथे, की जेणेकरून घड्याळाचे काटे त्यांच्या बाजूने उलटे फिरविता येतील. परंतु त्यांची वेळ चुकली होती आणि त्यांच्या भारतीय प्रजेचे सांत्वन करण्याच्या हेतुबरोबरच, त्यांनी निवडलेल्या प्रतिमांच्या बाबतीत सुद्धा. नियतीने असे ठरविले होते की, अशोकाच्या स्थापत्यकलेतील (आर्किटेक्चर) निवडलेली प्रतीके ही केवळ सुशोभीकरणासाठी नव्हती; तर ती भविष्यातील स्वतंत्र भारताची सामर्थ्यशाली प्रतीके ठरणार होती. “प्रासाद/राजवाडा” की ज्याला बांधकामासाठी १९१२ ते १९२९ अशी १७-१८ वर्षे लागली होती, ती त्या वसाहतवादी नियोजकांकडून फक्त पुढील १८ वर्षे वापरण्यासाठी गेली. ई. स. १९४७ मध्ये तो (प्रासाद) नवीन भारतीय प्रजासत्ताकाकडे सुपूर्त केला गेला आणि २६ जानेवारी १९५० पासून पुढे भारतीय राष्ट्रपतींकडून वापरात आला.

असे समजले जाते की, सम्राट अशोकाद्वारे ८४००० स्तूप त्यावेळच्या भारतभरामध्ये उभारण्यात आले. आणि त्या प्रत्येकामध्ये, मूळच्या ८ पैकी ७ स्तूपामधून उकरून मिळविलेल्या, बूदधाच्या मूळच्या अवशेषांपैकी (अस्थिपैकी) काहीना-काही भाग ठेवला गेला. हवामान आणि काळाच्या ओघात अशोकाचे बहुतेक सर्व स्तूप जमीनदोस्त होऊन गेले, आणि भारताच्या एकमेव लक्षणीय वास्तुवरील छत्राप्रमाणे, की जेथून ह्या मोठ्या खंडप्राय देशाचा कारभार (प्रशासन) चालणार होता, त्या स्तूपाच्या सहाय्याने सार्थपणे लुटिएन्स यांनी प्रभावीपणे सर्व भारतावर स्तूप उभारला. आणि समर्पकपणे, जे अवशेष अशोकाने अत्यादराने स्थापित केले होते, ते भारतीय मातीचा मोठ्याप्रमाणावर आणि अविभाज्य भाग होऊन गेले.

अशोकाच्या आदर्श प्रतिमा-प्रतिकांपैकी, भारताने आणखी दोन प्रतीके घेऊन आपल्या अध्यात्मिक वारशांचा गौरव/सन्मान केला. ‘धम्म-चक्र’ भारतीय राष्ट्रध्वजावरील प्रतीक म्हणून भूषविले गेले – बुद्धाच्या शिकवणुकीप्रती, देशाप्रती असलेली आपली बांधिलकी व्यक्त केली. आणि बुदधानि सारनाथ येथे सर्वप्रथम आपला उपदेश दिला, तेथील अशोकस्तंभावरील चार सिंहमुद्रा, की ज्या धम्माच्या प्रथम उद्घोषाचे सिंह गर्जनेच्या रूपात प्रतीक आहेत, त्या (चार सिंहमुद्रा) देशाचे अधिकृत मानचिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.

त्यापलीकडे, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी, राष्ट्रपती भवनात कलकत्ता येथील भारतीय वस्तुसंग्रहालयातून, दोन राष्ट्रीय ठेवा आणून जपला. आणि त्यातील ‘ह्या दोन वस्तु सुयोग्य ठिकाणी ठेवल्या : ई. स. च्या चौथ्या ते पाचव्या शतकातील, इंडो-ग्रीक, गांधार बुद्ध-मूर्ती ही, सांची स्तूपाच्या प्रेरणेतून उभारलेल्या, स्तूपामध्ये स्थापित केली. आणि ई. स. पूर्व तिसऱ्या शतकातील मौर्य (म्हणजे अशोक-कालीन), वृषभ (मूर्ती) स्तंभाच्या मधोमध ठेवली.’ (४). १९५२ मध्ये नेहरू लिहितात, ‘प्रामुख्याने लोकांच्या दृष्टीस पडेल अशारीतीने हा वृषभ ठेवलेला मला हवा आहे. तो ‘सेंट्रल एशियन प्राचीन वस्तुसंग्रहालयातील अंधारात धूसर होऊन गेलेली कल्पना मला आवडणार नाही…. . वृषभासाठी सुयोग्य जागा ही ओसरीचा (व्हरांड्याचा) मध्यभाग ही ठरेल.’ (५). त्याचप्रमाणे बुद्धाची मूर्ती सुद्धा योग्य ठिकाणी स्तूपाच्या कमानीच्या खाली स्थापित केली गेली, (जणू काही ती) भारतीय राष्ट्रपतींच्या खुर्चीकडे दयाळूपणे आशीर्वाद देत निरखत आहे. या सर्वांची (घटनांची) जुळवाजुळव केली तर असे दिसते की, जणूकाही त्या आपणास सांगत आहेत की, स्वतंत्र भारताचा पुनरुदय/पुनरुदभव आणि धम्म हातात हात घालून वाटचाल करीत आहे.

लुटिएन्सने अभावितपणे/अहेतुकपणे प्रासादाचा आराखडा केला तो ब्रिटिश राज्याच्या बळकटीकरणासाठी नव्हता, परंतु तो अशोकाच्या भारताच्या पाऊलखुणांचा मागोवा घेणाऱ्या तेजस्वी आणि प्रखर धम्म राज्यासाठी होता.

भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, धम्माचे पुनरुज्जीवन हे प्रतिकात्मकतेपलीकडे जाऊन भारतीय नागरिकांच्या हृदयात स्पंदन पावू लागले. धम्म, बुद्धाची शिकवण, आर्य अष्टअंगिक मार्गामध्ये जशी प्रस्तुत होते, तशी ती शील, समाधी, आणि प्रज्ञा या तीन शीर्षकामध्ये संक्षिप्तपणे समाविष्ट होते. भारतीय स्वातंत्र्याच्या ९ वर्षानंतर, ई. स. १९५६ मध्ये सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, डॉ. भीमराव आंबेडकर, यांनी भारतीय उपखंडाचा भौगोलिक मध्यवर्ती भाग असलेल्या नागपूर येथील दीक्षाभूमीवर (बुदधीजम) बौद्धधर्म स्वीकारला, आणि त्यांच्या ६००,००० अनुयायांना तसे करण्यास सांगितले. हे सरतेशेवटी लाखों भारतीय नागरिकांना धर्मांतराकडे घेऊन गेले की ज्यामुळे ‘बुद्धं शरणं गच्छमि’ च्या प्रतिघोषाच्या लहरी/लाटा संपूर्ण भारतभर प्रतिध्वनीत होत गेल्या. या क्रांतिकारक महत्वपूर्ण प्रसंगाने डॉ. आंबेडकरांनी अंतिमतः स्वतंत्र भारतामध्ये, बुद्धाच्या प्राथमिक तत्वाची पुनःप्रतिष्ठापना केली.

ई. स. १९५९ मध्ये दलाई लामा, चिनव्याप्त तिबेटमधून पसार होऊन, भारतात आश्रय घेण्यासाठी आले आणि त्यानंतर त्यांच्या निर्वासितांचा लोंढाही आला. परमपावन यांच्याप्रमाणेच ते महायान बौद्धधर्माचे अनुयायी होते; आणि सोबतच त्यांनी पारंपारिक स्वरूपातील अभ्यास, कर्मकांड आणि व्यावहारिक पक्षही आणला.

बुद्धाच्या शिकवणुकीचा परमोच्च भाग असलेल्या विपश्यना ध्यान विधीच्या पुनरागमनानंतर या धम्म पुनरुज्जीवनाची सांगता झाली (परमोच्च बिंदु गाठला गेला). या रचनांतरणात्मक ध्यानपद्धतीची प्रकाश ज्योत श्री. सत्यनारायण गोयंका यांनी म्यानमारमधून (ब्रह्मदेशमधून) परत भारतात वाहून आणली. जेव्हा ई. स. १९६९ मध्ये गोयंकाजी त्यांच्या वृद्ध पालकांना विपश्यना शिकविण्यासाठी भारतात आले, तेव्हा त्यांच्या असे निदर्शनास आले की, या ध्यानविधी विषयी उदंड आवड/उत्सुकता आहे. त्यामुळे भारतात राहण्याचा आणि पुढेही ध्यानपद्धती शिकविण्याचा दृढ संकल्प त्यांनी केला. धम्माच्या उद्गम-भूमीमध्ये (मातृभूमीमध्ये) बुद्धाच्यानंतर २५०० वर्षांनी पुनरुज्जीवनासंबंधीचे भाकीत सफलीभूत होण्याची वेळ जवळ आली होती.

भारताचे यापूर्वीचे राष्ट्रपती, श्री. रामनाथ कोविन्द, हे जरी जगातील ५ क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसंख्येचा कार्यभार याच राष्ट्रपती भवनाच्या स्तूपाखालील त्यांच्या सर्वोच्च कार्यालयातून सांभाळत होते तेव्हाही ते विपश्यना ध्यानविधीचे प्रामाणिक अभ्यासक होते. त्यांचे बंधू गोयंकाजी-प्रणीत विपश्यना ध्यान-प्रणालीचे सहाय्यक आचार्य झालेले होते. आणखी एक भूतपूर्व राष्ट्रपती, श्रीमती प्रतिभा पाटील या, त्यांच्या पदाच्या कार्यकाळानंतर, दहा दिवसांच्या विपश्यना शिबिरात सहभागी झाल्या होत्या. त्यांची कन्यादेखील अगोदर पासूनच विपश्यनेच्या अभ्यासक आहेत, आणि धम्मगिरी, ईगतपुरी येथील ‘सयाजी ऊ बा खीन व्हीलेज’ येथे त्यांचे निवासस्थान देखील आहे. भारतातील सध्याच्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये असे जेष्ठ सभासद आहेत की जे विपश्यना ध्यान पद्धतीचा अभ्यास करतात. सध्याचे भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी देखील, गोयंकाजींच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजलि वाहण्यासाठी मुंबईला गेले होते. अशाप्रकारे भारतीय राज्यसंस्थेवर धम्माचा प्रभाव आहे.
आज, भारतीय समाजातील सर्व धर्म-संप्रदाय, समाज, आणि स्थाने यांच्या रूपातील वस्त्रामध्ये धम्माचे धागे गुंफले जात आहेत, हळुवारपणे धीमेपणाने या देशाची एकात्मतेची वीण घट्ट होत आहे. जीवनाच्या सर्व थरातील जिज्ञासूंमुळे विपश्यना शिबिरांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. शतकानुशतके सुषुप्त असलेला संबोधीच्या मार्गाने पुनश्च (एकदा) अशोकाच्या प्राचीन साम्राज्यावर विजयपताका रोवली आहे.
बुद्धाच्या महापरिनिर्वाणावेळी, त्यांच्या सहाय्यक आनंदाने शासत्याला ‘त्यांच्या सर्वोच्च स्थानाचा वारसा कोणाकडे जाईल’ असे विचारले होते. बुदधानि प्रत्युत्तरादाखल ‘कोणाकडेही (व्यक्तीकडे) नाही’ असे सांगून, ‘धम्म आणि विनय एकत्रितपणे मार्गदर्शन करतील’ असे म्हटले होते. ‘विनय’ हा सद्‍वर्तनी आणि विनीत बौद्ध भिक्षूच्या ‘भिक्षू-संघाचे’ मार्गदर्शन/ प्रशासन करणाऱ्या नियमांचा संच आहे. जसा आता भारतात सर्वदूर धम्म त्याच्या मौलिक, शुद्ध स्वरूपात उपलब्ध आहे, तसाच ‘विनय’ – भिक्षूसंघाच्या प्रातिनिधिकतेनुसार, पुढील टप्प्यात भारत भूमीला व्यापणार आहे असे म्हणता येईल. निःशंकपणे, काही कालावधीतच आपल्याला ते दिसून येईल.

ज्या वाचकांना या विषयी अधिक चर्चा करावयाची असल्यास लेखकाशी ईमेलद्वारे संपर्क साधावा – [email protected]

संदर्भ –

References
1. Nath, Aman. Dome over India: Rashtrapati Bhavan; India Book House, 2002.

2. Lutyens, Sir Edwin Landseer, edited by Clayre Percy and Jane Ridley. The Letters of Edwin Lutyens to His Wife, Lady Emily; Collins, 1985.

3. Ridley, Jane. Edwin Lutyens: His Life, His Wife, His Work; Vintage, 2003.

4. “The Main Building and Central Lawn, Circuit 1: Durbar Hall,” n.d. https://rashtrapatisachivalaya.gov.in/rbtour/circuit-1/durbar-hall.

5. “The Main Building and Central Lawn, Circuit 1: Rampurva Bull,” n.d. https://rashtrapatisachivalaya.gov.in/rbtour/circuit-1/rampurva-bull.

Devendra Fadnavis On Rahul Gandhi | पुण्याच्या घटनेचं राजकीयकरण केलं हे निषेधार्य, पोलिसांनी योग्य कारवाई केली – देवेंद्र फडणवीस

Related Posts