IMPIMP

SSY | अवघ्या 250 रुपयात उघडा ‘हे’ खाते, मिळतील 15 लाख, जाणून घ्या कसे?

by nagesh
New Wage Code | new wage code july 2022 impact on gratuity ctc in hand salary provident fund retirement benefits

नवी दिल्ली : वृत्तसंस्था SSY | सामान्य लोकांसाठी चांगली बातमी आहे. जर मुलीच्या शिक्षणाच्या आणि विवाहाच्या खर्चाबाबत चिंतेत असाल तर आता अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. तुम्ही दरदिवशी 8 ते 10 रुपये वाचवून सुद्धा सुटका मिळवू शकता. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana – SSY) एक अशी सरकारी योजना आहे, जिथे तुम्ही अतिशय कमी पैशांची गुंतवणूक करून एक मोठी रक्कम मिळवू शकता. आणि आपल्या लाडक्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता.

 

सुकन्या समृद्धी योजना (SSY) द्वारे तुम्ही आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता.
या योजनेत आई-वडिल किंवा पालक या योजनेत मुलीच्या नावावर केवळ अकाऊंट उघडू शकतात.
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत हे अकाऊंट एखाद्या पोस्ट ऑफिस किंवा कमर्शियल ब्रँचच्या अधिकृत शाखेत उघडू शकता.

 

या योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला फॉर्मसह पोस्ट ऑफिस किंवा बँकेत मुलीचा जन्माचा दाखला जमा करावा लागेल.
याशिवाय आई-वडीलांचे ओळखपत्र (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, टेलीफोन बिल, पाणी बिल) जमा करावे लागेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

यामध्ये मिनिमम डिपॉझिट 250 रुपये करावे लागते.
याशिवाय कमाल 1,50,000 रुपयापर्यंत डिपॉझिट करू शकता.
हे खाते उघडल्याने मुलीचे शिक्षण आणि पुढील खर्च करण्यात मदत मिळते.

 

सुकन्या समृद्धी खात्यात एका आर्थिक वर्षात किमान रक्कम जमा न केल्यास 15 वर्षाच्या कालावधी दरम्यान ती कधीही रेग्युलर करता येणार नाही.
यासाठी प्रत्येक वर्षाच्या हिशेबाने 50 रुपये दंड भरावा लागेल.

 

या योजनेत सध्या 7.6 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
यावर इन्कम टॅक्स सूट सुद्धा मिळते. जर तुम्ही दरमहिना 3000 रुपये गुंतवले म्हणजे वार्षिक 36000 रुपये तर 14 वर्षानंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाऊंडिंगच्या हिशेबाने तुम्हाला 9,11,574 रुपये मिळतील.
21 वर्ष म्हणजे मॅच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये होते.

 

Web Title : SSY | best investment option daughter ssy sukanya samriddhi yojana you can open account 250 rupees and get rs 15 lakh benefits check

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | … अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा राज्यातील जनतेला थेट इशारा

Pune Shivsena | पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुखपदी आदित्य शिरोडकर

LIC Kanyadaan policy | जर तुम्ही ‘या’ योजनेत जमा केले 130 रूपये तर मॅच्युरिटीनंतर मिळतील पूर्ण 27 लाख; जाणून घ्या कसे?

 

Related Posts