IMPIMP

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत पुन्हा तेजी, सोनं ’47’ हजार पार; जाणून घ्या

by nagesh
Gold Price Today | gold silver price increased today gold rate crossed 47000 check latest rate in mumbai

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | गेल्या काही दिवसापासुन सोन्याच्या दरात सतत घट होताना दिसत आहे. दररोज होणा-या सोन्या-चांदीच्या (Silver) किंमतीत बदल हा किरकोळ प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे. मात्र मागील काही दिवसाच्या घसरणीनंतर आता सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसुन येते. आज (शुक्रवारी) सोन्याच्या किंमतीत 0.15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या सोनं 47,000 पेक्षा अधिक आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

त्याचबरोबर चांदीच्या दरात (Silver Price) देखील किंचीत वाढ झाली आहे. सोन्या-चांदीचा आजचा भाव (Gold-Silver Price Today) मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) आज ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याच्या किंमतीत 0.15 टक्क्यांनी वाढ होऊन किंमती 47 हजारांपार गेल्या आहेत. MCX वर सोन्याचे दर प्रति तोळा 47,060 रुपये आहेत. तर चांदीच्या किंमतीत (Silver Price) शुक्रवारी 0.02 टक्क्यांची किरकोळ तेजी पाहायला मिळाली आहे. या तेजीनंतर दर 63,297 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे.

या दरम्यान, ग्राहकाला जरी सोने आणि चांदीच्य़ा किंमती (Gold-Silver Price Today) माहित करुन
घ्यायच्या असेल तरी घरबसल्या हे काम करू शकणार आहे. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकणार आहात.

 

Web Title : Gold Price Today | gold silver price increased today gold rate crossed 47000 check latest rate in mumbai

 

हे देखील वाचा :

Pune Crime | महिलेला काम देण्याच्या आमिषाने नेऊन लुबाडले ! डोक्यात दगड घालून केले जखमी, कोंढव्यातील धक्कादायक घटना

Coronavirus | राज्यात ‘या’ दिवसापासून कोरोनाची तिसरी लाट?; गणेशोत्सवापूर्वी ‘निर्बंध’ पुन्हा कडक

Ministry of Defence Recruitment 2021 | सरकारी नोकरीची संधी, 10 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज; 400 पदांसाठी भरती, जाणून घ्या

 

Related Posts