IMPIMP

Coronavirus | राज्यात ‘या’ दिवसापासून कोरोनाची तिसरी लाट?; गणेशोत्सवापूर्वी ‘निर्बंध’ पुन्हा कडक

by nagesh
Covid-19 In India | 5 lifestyle changes to stay healthy amid covid 19

सरकारसत्ता ऑनलाइन  – Coronavirus | कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल  करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा गर्दी वाढू
लागली आहे. अशातच गणेशोत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर
दुसरीकडे कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेचे संकेत दिले असून ती लाट  20 सप्टेंबर ते 30 ऑक्‍टोबर या कालावधीत येईल, असा अंदाज टास्क फोर्स  व आपत्ती व्यवस्थापन  वर्तविला आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी  राज्यात निर्बंध पुन्हा कडक करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाव्य कोरोनच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  व मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यात गुरुवारी वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. पुढील आठवड्यात टास्क फोर्सची बैठक होणार असून, त्यानंतर 10 सप्टेंबरपूर्वीच निर्बंध कडक  करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार कोरोनाची तिसरी लाट 40 दिवसांची असेल. मात्र कोरोनाची दुसरी लाट कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांमधील ग्रामीण भागातून ओसरलेली नाही.  गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, अशी भीती आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी राज्यातील निर्बंध पुन्हा कडक केले जाणार आहेत.

मास्क न घालता फिरणाऱ्यांचे प्रमाण सद्य:स्थितीत लक्षणीय आहे. विशेषत: ग्रामीणमध्ये नियमांचे पालन होताना दिसत नाही. शहरातील बाजारपेठांमध्ये  गर्दी वाढली असून त्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ऑक्‍सिजन निर्मिती, सावठण क्षमता वाढविली आहे. तसेच रुग्णालयांमध्येही खाटांची व्यवस्था केली असून त्या ठिकाणी बालकांसाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचे अप्पर सचिव श्रीरंग घोलप म्हणाले, दरवर्षी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात दर्शनासाठी

भाविकांची  मोठी गर्दी होते. गर्दी वाढली तर कोरोनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे सुरक्षिततेसाठी राज्यातील
कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन  आरोग्य विभाग निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेऊ शकते.  तज्ज्ञांनी
वर्तवलेल्या अंदाजानुसार 20 सप्टेंबर ते 30 ऑक्‍टोबर या काळात कोरोनाची तिसरी लाट येईल.

 

Web Title : Coronavirus | experts said that the third wave of corona is expected in the state in september

 

हे देखील वाचा :

Ministry of Defence Recruitment 2021 | सरकारी नोकरीची संधी, 10 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज; 400 पदांसाठी भरती, जाणून घ्या

Heart Disease | आक्रोड खाल्ल्याने कमी होतो हृदय रोगांचा धोका, 8.5% पर्यंत कोलेस्ट्रॉलचा स्तर करते कमी – रिसर्चमध्ये दावा

Gangster Nilesh Ghaiwal | गँगस्टर नीलेश घायवळला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा, जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts