IMPIMP

Sharad Pawar | सरसंघचालकांच्या ‘त्या’ वक्तव्याने माझ्या ज्ञानात भर पडली’; शरद पवारांचा टोला

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar taunts rss chief mohan bhagwat over his statement of hindus muslims in india have same ancestors

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सर संघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मुंबईमधील (Mumbai) एका कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लिम यांचे पूर्वज एकच आहेत. असं विधान केलं होतं. या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोहन भागवतांनी केलेल्या वक्तव्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडलीय, अशी प्रतिक्रिया देत पवार यांनी टोला लगावला आहे.

 

सर संघचालक मोहन भागवत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरुन शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, चांगली गोष्ट आहे, सर्व धर्म एकच समजतात तर, हे दोन्ही समाजाचा मूळ जन्म एकाच कुटुंबातून झाला आहे. सर्वांचं मुळ एकच ही माझ्याही ज्ञानात भरच पडली आहे, असं म्हणत शरद पवार यांनी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

काय म्हणाले होते मोहन भागवत?

सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) मुंबई (Mumbai) दौऱ्यावर होते. सोमवारी ग्लोबल
स्ट्रॅटेजिक पॉलिसी या संस्थेच्या वतीने आय़ोजित केलेल्या राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोतोपरी या विषयावर मोहन
भागवतांनी आपली भूमिका मांडली आहे. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिम यांचे पूर्वज एक आहेत. देश
पुढे जायचा असेल तर सर्वांना सोबत जावे लागले. आमच्यासाठी हिंदू हा शब्द आहे, मातृभूमी, गौरवशाली
परंपरा आणि आपले पूर्वज यांचा प्रतिशब्द आहे. असं त्यांनी म्हटलं होतं.

 

Web Title : Sharad Pawar | sharad pawar taunts rss chief mohan bhagwat over his statement of hindus muslims in india have same ancestors

 

हे देखील वाचा :

Uday Samant | राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपासुन सुरु होणार – उदय सामंत यांची घोषणा

Pravin Gaikwad | ‘मराठा ही बिझनेस कम्युनिटी व्हावी’, प्रवीण गायकवाड यांचे प्रतिपादन

Rain in Maharashtra | राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; पुण्यासह ‘या’ 18 जिल्ह्यांना हाय अलर्ट

 

Related Posts