IMPIMP

Gold-Silver Price Today | 2 आठवड्यात 2000 रुपयांनी सोनं झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचा दर

by nagesh
Gold Price Today | dussehra buys record breaking gold mumbai four hundred crore crossing stage know in details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमतीमध्ये (Gold-Silver Price Today) मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. दरम्यान शुक्रवारी (दि.13) सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi-Commodity Exchange MCX) ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात (Gold-Silver Price Today) वाढ झाली आहे. 0.19 टक्क्यांनी झालेल्या या वाढीमुळे दर 46 हजार 449 रुपये प्रति तोळा झाला आहे.

 

सोन्याचे दर या आठवड्याच्या सुरुवातीला चार महिन्यातील निचांकी पातळीवर होते. दरम्यान यामध्ये
आठवडाभरात थोडीशी सुधारणा झाली आहे. शुक्रवारी चांदीच्या दरात देखील (Silver Rates Today)
वाढ झाली आहे. आज चांदीची वायदा किंमत 0.30 टक्क्यांनी वाढून 62 हजार 047 प्रति किलो झाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आंतरराष्ट्रीय बाजारात दर स्थिर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आज स्थिर आहेत. स्पॉट गोल्डच्या (Spot Gold) किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आजचा दर 1752.78 डॉलर प्रति औंस आहेत. या आठवड्यात दर 0.5 टक्क्यांनी कमी झाले आहेत. अमेरिकन सोन्याची वायदे किंमत 0.2 टक्क्यांनी वाढून 1754.40 डॉलर आहे.

 

 

2 आठवड्यात 2000 रुपयांनी सोनं स्वस्त

दोन आठवड्यापूर्वी सोन्याचा दर 48 हजार 390 रुपये प्रति तोळा होते. दोन आठवड्यात सोन्याचे दर जवळपास 2 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दर दोन आठवड्यापूर्वी 67 हजार 976 रुपये प्रति किलो होते. त्यामुळे आजपर्यंत चांदीच्या दरात साधारण सहा हजार रुपयांची घसरण झाली आहे.

 

 

हाय रेकॉर्ड पेक्षा 9 हजारांनी सोनं स्वस्त

मागील ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरात प्रति तोळा 56 हजार 200 रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर
सोन्याच्या दरात घसरण झाली. सर्वोच्च पातळीवर पोहचलेले सोन्याचे दर 9450 रुपयांनी आज
स्वस्त आहेत. तज्ज्ञांच्या मते सोने खरेदीसाठी आज चांगली वेळ आहे. या वर्षाअखेरपर्यंत सोन्याच्या
दरात पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या स्वस्तात सोनं खरेदीची एक संधी असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

 

Web Title : Gold-Silver Price Today | gold price today below rs 46500 rates check gold and silver rates on 13th august 2021

 

हे देखील वाचा :

Crime News | 4 वर्षाच्या मुलाने घरासमोर लघवी केल्यानं शेजारी भडकला, अल्पवयीन मुलाने वस्तऱ्याने सपासप वार करुन चिमुकल्याच्या आईचा निर्घृण खून

Delta Plus Variant | मुंबईत 60 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसने मृत्यू; आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’

Pune Corporation | नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळे पुणे महापालिकेचे वार्षिक 60 लाखांचे नुकसान

 

Related Posts