IMPIMP

Delta Plus Variant | मुंबईत 60 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसने मृत्यू; आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’

by nagesh
Coronavirus | Coronas havoc Infection of 40 leaders including three Chief Ministers four Deputy Chief Ministers six Union Ministers

मुंबई न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे (Delta Plus Variant) काही दिवसापासून रुग्ण आढळून येत होते. मात्र, या व्हेरिएंटच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले नव्हते. मात्र बुधवारी मुंबईत एकाच दिवशी डेल्टा प्लस बाधित ७ रुग्ण आढळून आले.गुरुवारी या विषाणूची लागण झालेल्या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या महिलेने कोविड वरील लसचे दोन्ही डोस घेतले होते. या माहितीला मुंबई महापालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून आरोय यंत्रणा अलर्ट झाली आहे. डेल्टा प्लसने (Delta Plus Variant) झालेला हा मुंबईतील पहिला मृत्यू आहे.

 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डेल्टा प्लस बाधित ७ रुग्ण आढळून आले.
त्यामध्ये या महिलेचाही समावेश होता. हि महिला उपनगरात राहणारी असून तिने लसीचे दोन्ही डोस घेतले होते. संबंधीत महिलेस कोरडा खोकला, अंगदुखीचा त्रास त्याचबरोबर तोंडाचीही चव गेली होती.
त्यानंतर तिची कोरोना चाचणी करण्यात आली.
त्यामध्ये ती बाधित आढळून आली. एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात महिलेवर उपचार सुरू होते. ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्यानंतर रेमडेसिवीर आणि स्टेरॉइड्स त्यांना देण्यात येत होते.
मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून डेल्टा प्लस विषाणूची लागण होऊन महिलेचा मृत्यू झाल्याचे जीनोम सीक्वेन्सिंगमध्ये स्पष्ट झाले आहे.
मृत्यूवेळी मधुमेहासह अन्य आजारांमुळे गुंगागुंत वाढत गेली होती असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान या महिलेच्या कुटुंबातील ६ जणांना करोना संसर्गाची लागण झाली असून त्यातील दोन जण डेल्टा प्लस विषाणू बाधित असल्याची माहिती समोर येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये डेल्टा प्लसने महिलेचा मृत्यू जूनमध्ये झाला होता.
त्यानंतर आता मुंबईत आणखी एक मृत्यू झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

राज्यात डेल्टा प्लसचे ६४ रुग्ण

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात बुधवारी डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २० नवे रुग्ण आढळले.
त्यामुळे डेल्टा प्लस बाधित एकूण रुग्णांची संख्या ६५ वर पोहचली.
नव्याने आढळलेल्या २० रुग्णांपैकी मुंबई येथे ७, पुणे येथे ३, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर येथे प्रत्येकी २, चंद्रपूर आणि अकोला येथे प्रत्येकी १ रुग्णांचा समावेश आहे. तर मुंबईतील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title : Delta Plus Variant | mumbai records first death from delta plus variant

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळे पुणे महापालिकेचे वार्षिक 60 लाखांचे नुकसान

Pune Crime | इमारत निधी न दिल्याने विद्यार्थ्याला मारहाण ! मुख्याध्यापकासह शिक्षक, क्लार्कवर गुन्हा दाखल

Pune News | काय सांगता ! होय, …म्हणून पुण्यातील ‘या’ ग्रामपंचायतीनं गावभर वाटले कंडोम

 

Related Posts