IMPIMP

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! शुक्रवारी ‘या’ वेळेला 3 तासासाठी बंद राहिल बँकेची ‘ही’ सर्व्हिस, चेक करा टायमिंग

by nagesh
SBI Customers Alert | sbi internet banking yono yono lite upi like facilities will remain closed on tomorrow

नवी दिल्ली : वृत्तसंस्था स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 44 कोटी खातेधारकांसाठी महत्वाची सूचना (SBI Important Notice) जारी केली आहे. बँकेने ट्विट करून आपल्या ग्राहकांना अलर्ट केले आहे आणि त्यांना गरजेनुसार बँकिंगसंबंधी कामे अगोदरच उरकून घेण्याची विनंती केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ही महत्वाची सूचना जारी करून म्हटले आहे की, बँकेच्या काही महत्वाच्या सर्व्हिस उद्या आणि परवा बंद राहतील.

 

एसबीआयने ट्विटरवर म्हटले की, सिस्टम मेन्टनसमुळे 6 आणि 7 ऑगस्टला बँकेच्या काही सेवा बंद राहतील. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, Yono, Yono Lite आणि UPI सर्व्हिसचा समावेश आहे. एसबीआयने ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे की या सेवा 6 आणि 7 ऑगस्टच्या रात्री 10 वाजून 45 मिनिटांपासून रात्री उशीरा 1 वाजून 15 मिनिटापर्यंत (150 मिनिटे) या सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

एसबीआयद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना आणखी चांगली सेवा देण्यासाठी बँक आपला UPI प्लॅटफॉर्म अपग्रेड करणार आहे. या दरम्यान ग्राहकांना यूपीआई ट्रांजक्शन बंद राहील.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

यापूर्वी सुद्धा सेवा होती बंद

एसबीआय पहिल्यांदा अशाप्रकारे सेवा बंद करत नसून यापूर्वी सुद्धा बँकेने 16 आणि 17 जुलैला
रात्री 10 वाजून 45 मिनिटांपासून रात्री उशीरा 1 वाजून 15 मिनिटापर्यंत या सेवा बंद केल्या होत्या.

 

Web Title : sbi services internet banking yono yono lite upi closed tomorrow during this period check

 

हे देखील वाचा :

Pimpri Crime | वाहनचोर जोमात, पिंपरी-चिंचवड शहरातून 6 दुचाकी चोरीस

Pornography | युपी सचिवालयातील सचिवाचा पॉर्न व्हिडीओ व्हायरल, कॅमेऱ्यात झाला कैद

Maratha Kranti Morcha | मराठा क्रांती मोर्चासह इतर संघटनांची सोमवारी पुण्यात बैठक

Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपाल आणि ठाकरे सरकार नवा संघर्ष चिघळणार? राज्यपालांच्या दौऱ्यावेळी पालकमंत्री अनुपस्थित राहणार

 

 

Related Posts