IMPIMP

Pune Crime | घरकाम करणार्‍या महिलेने तिजोरीसह 25 लाखांचे दागिने, परदेशी चलन केले लंपास; कोंढव्यातील घटना

by nagesh
Pune Crime | The housemaid made jewelery worth Rs 25 lakh, foreign currency stolen along with a safe; Incidents in Kondhwa

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)  Pune Crime | वयोवृद्ध जोडप्याच्या घरी तीन दिवस काम करणार्‍या एका महिलेने तिजोरीसह २५ लाख रुपयांचे दागिने, परदेशी चलन लंपास करुन पोबारा केला आहे. याप्रकरणी जयश्री (रा. वानवडी) या महिलेविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत एका ७६ वर्षाच्या वृद्धाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांच्या पत्नी कोंढवा भागातील कमेला परिसरातील (Kamela, Kondhwa,) गुलमोहर सोसायटीत (gulmohar society kondhwa) राहतात. फिर्यादी हे परदेशात नोकरीला होते. सेवानिवृत्तीनंतर ते पुण्यात रहायला आले आहेत. २७ जुलै रोजी एक महिला त्यांच्याकडे घरकाम मागण्यासाठी आली. त्यांना घरकामासाठी महिलेची आवश्यकता असल्याने तिला कामाला ठेवून घेतले. दोन दिवस काम पाहिल्यानंतर त्यांना तिचे काम चांगले वाटले. ३० जुलैला दुपारी चार वाजता ती काम करुन निघून गेली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी परत कामाला आलीच नाही. शुक्रवारी फिर्यादी यांच्या पत्नी तिजोरीत दागिने ठेवण्यासाठी गेल्या. तेव्हा त्यांना तिजोरी जागेवर आढळून आली नाही. त्यांच्या या तिजोरीला बायोमेट्रिक कुलूप आहे.

 

 

तिजोरीत ५३२ ग्रॅम वजनाचे २४ लाख २३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने, ५५ हजार रुपये रोख, ५०० अमेरिकन डॉलर, ४ हजार दुबई दिनार असे परदेशी चलन व १० हजार रुपयांची तिजोरी असा २४ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
घरकामासाठी आलेल्या महिलेने मास्क वापरला असल्याने तिचा चेहरा फिर्यादी यांनी पाहिला नव्हता.
तसेच तिचे आधार कार्ड, मोबाईल नंबरही त्यांनी घेतला नव्हता.
तीन दिवस काम करुन तिने या कुटुंबाला चांगलाच हात दाखविला.
तिजोरी उघडता न आल्याने तिने अख्खी तिजोरीच चोरुन नेली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव (Assistant Police Inspector Jaywant Jadhav) तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | The housemaid made jewelery worth Rs 25 lakh, foreign currency stolen along with a safe; Incidents in Kondhwa

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन दिले घर पेटवून; कपडे, पोत्याच्या बारदानासह रिक्षा, मोटारसायकल जळून खाक

Mumbai News | मुंबईतील 3 रेल्वे स्टेशन आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी; प्रचंड खळबळ, सुरक्षा वाढवली

Android यूजर्सने व्हावे सावध, तुमच्या फोनची स्क्रीन रेकॉर्ड करत आहे हे अ‍ॅप

 

Related Posts