IMPIMP

T-20 World Cup 2021 | विराट कोहली कर्णधार पदावरुन ‘पायउतार’ होणार; रोहित शर्मा भारताचा कर्णधार?

by nagesh
T-20 World Cup 2021 | icc mens t20 world cuprohit sharma could be white ball skipper after t20 world cup

नवी दिल्ली : वृत्तसंस्था T20 World Cup 2021 | इंडियन टीमचा कॅप्टन (Indian team) विराट कोहली (Virat Kohli) टी-20 विश्वचषकानंतर (T20 World Cup 2021) मर्यादित मॅचचे कर्णधारपद (Captaincy) सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टी-20 आणि एकदिवसीय सामन्यासाठी कोहली कर्णधारपदावरुन पायउतार होणार असल्याची शक्यता आहे. कोहलीच्या उत्तराधिकारी म्हणुन रोहित शर्माकडे (Rohit Sharma) टी-20 आणि एकदिवसीय टीमची जबाबदारी सोपवली जाऊ शकणार आहे. कर्णधार पद सोडण्याबाबत विराट कोहलीने (Virat Kohli) रोहित शर्मा आणि भारतीय संघाच्या व्यवस्थापकासोबत अधिक वेळ चर्चा देखील केली आहे. त्यामुळे कोहली खुद्द हे पद सोडणार असल्याची घोषणा देखील करु शकतो.

 

 

मीडिया रिपोर्टनुसार, फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विराट कोहली कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेऊ शकणार आहे. दरम्यान, मागील अनेक वर्षापासुन विराट कोहली (Virat Kohli) फलंदाज म्हणुन अनेक अशी चांगली कामगिरी केली आहे. कर्णधार पद मिळाल्यापासुन देखील भारताला यश मिळवून देण्यात कोहलीचा मोठा वाटा आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने अनेक विजयी मिळवले आहेत. दरम्यान, बाप झाल्यानंतर विराट कोहलीने फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा मोठा निर्णय घेऊ शकतो. विराटच्या मते, फलंदाजीवर आणखी लक्ष देण्यासाठी आणि जगभरातील सर्वश्रेष्ठ फलंदाज होण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने प्रारंभ करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पूर्णपणे फलंदाजीवर फोकस करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मुंबई इंडियन्सला 5 वेळा विजेतेपद मिळवून देणा-या रोहित शर्माचा (Rohit sharma) देखील भारताला विजयी मिळवून देण्यात मोठा वाटा आहे.

 

 

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने अनेकदा भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात आतापर्यंत भारतीय संघाने अव्वल कामगिरी केली आहे.
शर्माच्या नेतृत्वातात 10 एकदिवसीय सामन्यात भारताने 8 विजय मिळवले आहेत.
तर 19 टी-20 सामन्यापैकी 15 सामन्यात भारताचा विजय झाला आहे.

 

 

दरम्यान, दुबई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान टी-20 सामना होणार आहे. याच्यानंतर कोहली मर्यादीत सामन्याचं नेतृत्व सोडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सामन्यानंतर टी-20 विश्वचषकानंतर आगामी 2 वर्ष विश्वचषक होणार आहेत. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे. 2023 मध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. अशात रोहित शर्माला तयारीसाठी अधिक झोकुन वेळ द्यावा लागणार आहे.

 

Web Title : T-20 World Cup 2021 | icc mens t20 world cuprohit sharma could be white ball skipper after t20 world cup

 

हे देखील वाचा :

Shiv Sena | महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य; मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षीत शहर

Pune Crime | लॉकडाऊनने सहली झाल्या ‘रद्द’; हॉलिडे पॅकेजचे पैसे केले ‘फस्त’

ACP Vijay Chaudhary | ACP आणि ट्रीपल महाराष्ट्र केसरी ठरलेले पै. विजय चौधरी गणरायासमोर ‘बेभान’ होतात तेव्हा…

 

Related Posts