IMPIMP

Pune Crime | लॉकडाऊनने सहली झाल्या ‘रद्द’; हॉलिडे पॅकेजचे पैसे केले ‘फस्त’

by nagesh
 Pune Pimpri Crime | Had to buy car on OLX expensive, young man cheated of Rs 4.5 lakh; The incident took place in Sangvi premises

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | फिरण्यासाठी ८ जणांनी हॉलिडे पॅकेजसाठी पैसे भरले होते. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाला. त्यामुळे सहली रद्द झाल्या. तेव्हा ग्राहकांनी भरलेले पैसे परत न करता इन्जॉय व्हॅकेशन या टुर्स अँड ट्रॅव्हलर्सने (enjoy vacation tours and travels) फसवणूक करुन ११ लाख २७ हजार ८०० रुपयांना गंडा (Pune Crime) घातला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी रणछोड नगीनदास नागर (वय ७१, रा. शांतीनगर सोसायटी, गंगाधाम, कोंढवा) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar
Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी भुपेशा ऊर्फ विकी बाळकृष्ण ठक्कर (रा. बालाजीनगर, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

ठक्कर याचे इन्जॉय व्हॅकेशन या नावाचे टुर्स अँड ट्रॅव्हल्सचे धनकवडीतील के के मार्केटमध्ये कार्यालय आहे. फिर्यादी व इतर ७ जणांनी डिसेंबर २०१९ मध्ये हॉलिडे पॅकेज बुक करुन ठरल्याप्रमाणे सर्व पैसे भरले होते. मात्र, मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाला. त्यामुळे सहली रद्द करण्यात आल्या. सहली रद्द केल्याने फिर्यादी व इतरांनी पैसे परत मागितले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. पैसे परत न केल्याने ११ लाख २७ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title : Pune Crime | Lockdown trips ‘canceled’; Holiday package paid ‘fast’

 

हे देखील वाचा :

ACP Vijay Chaudhary | ACP आणि ट्रीपल महाराष्ट्र केसरी ठरलेले पै. विजय चौधरी गणरायासमोर ‘बेभान’ होतात तेव्हा…

Mutual Fund SIP | दरमहिना 10,000 रुपयांची करा गुंतवणूक, तीन वर्षांत मिळतील 6 लाख रुपये; जाणून घ्या

Hasan Mushrif | किरीट सोमय्यांच्या गंभीर आरोपानंतर हसन मुश्रीफांचा पलटवार, करणार 100 कोटीचा दावा

 

Related Posts