IMPIMP

Shiv Sena | महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य; मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षीत शहर

by nagesh
Sanjay Raut | uddhav thackeray phone call to sanjay raut after getting bail by pmla court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Shiv Sena | मुंबईच्या साकीनाका (Sakinaka rape case) परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी अमानवीय घटना घडली. या घटनेमुळे संपुर्ण राज्यात खळबळ उडाली. एका नराधम परप्रांतीयाने 32 वर्षाच्या महिलेवर पाशवी बलात्कार (Rape) करुन गुप्तांगावर गंभीर जखमा केल्या. यानंतर गंभीर अवस्थेत असणा-या महिलेला रुग्णालयात दाखल केले. काही काळाने त्या महिलेचा दुर्देवी मृत्यु (Died) झाला. या घटनेवरुन ठाकरे सरकारवर (Thackeray government) विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. राज्यात कायद्याचा धाक राहिला नसल्याचं भाजपकडून म्हटलं गेलं आहे. या सर्व घटनानंतर आता शिवसेनेने (Shiv Sena) सामना अग्रलेखातून आपली भूमिका मांडत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सामना अग्रलेखातून असं म्हटलं आहे की, मुंबईसह महाराष्ट्रात असे कायद्याचेच राज्य आहे.
विरोधकांनी साकीनाका बलात्कारप्रकरणी (Sakinaka rape case) कितीही धुरळा उडवला तरी कायद्याच्या राज्यास तडा जाणार नाही.
विरोधी पक्षनेते सांगतात, त्याप्रमाणे त्या नराधमाला फाशीची शिक्षा होईल.
कोणत्या विषयाचे व प्रकरणाचे राजकारण करायचे याचे भान ठेवायलाच हवे.
साकीनाकाप्रकरणी डोळय़ांत अश्रू यावेत ही मनाची संवेदनशीलता आहे.
पण नक्राश्रू ओघळू लागले की, भीती वाटते, प्रकरणाचे गांभीर्य नष्ट होते, असे शिवसेनेनं
(Shiv Sena) म्हटलं आहे.
तसेच, पोलिसांना त्यांचे काम करू द्या. तरीही साकीनाका प्रकरणाची फाईलही कुणाला ‘ईडी’
वगैरेकडे सोपवायची असेल तर त्यांना कोण रोखणार? काय वाट्टेल ते करू द्या, असा जोरदार पलटवार देखील शिवसेनेने (Shiv Sena) केला आहे.

भारतीय जनता पक्षाने या प्रकरणात विरोधी पक्षाची जी काही भूमिका आहे ती चोख बजावली आहे. मुंबई-महाराष्ट्रात महिला कशा सुरक्षित नाहीत असे तो आता ओरडून सांगत आहे. साकीनाक्याच्या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला असला तरी मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे, याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, असं म्हणत, अशा घटना एका भयानक विकृतीतून घडत असतात व जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात ही विकृती उफाळून येऊ शकते, असं देखील म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काय म्हणाले होते विरोधक?

राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून याला केवळ सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे.
यांना फक्त आपली खुर्ची सुरक्षित कशी ठेवता येईल याचीच काळजी लागून आहे.
राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यात हे सपशेल अपयशी ठरले आहे.
अशी टीका भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे.
मुंबईतील साकीनाका परिसरातील बलात्कार प्रकरण माणुसकीला आणि मुंबईच्या आजवरच्या लौकिकाला काळीमा फासणारं प्रकरण आहे.
अशी प्रकरणं वारंवार होत राहिली तर असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
त्यामुळे नराधमांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करुन फाशीच झाली पाहिजे.
तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घालून तातडीनं मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांशी बोलून एक विशेष जलदगती न्यायालय स्थापन करुन यात खटला चालवला जाईल यासाठी प्रयत्न करायला हवेत.
असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

Web Title : Shiv Sena | mumbai safest city world women shiv sena sanjay raut samana

हे देखील वाचा :

Pune Crime | लॉकडाऊनने सहली झाल्या ‘रद्द’; हॉलिडे पॅकेजचे पैसे केले ‘फस्त’

ACP Vijay Chaudhary | ACP आणि ट्रीपल महाराष्ट्र केसरी ठरलेले पै. विजय चौधरी गणरायासमोर ‘बेभान’ होतात तेव्हा…

Mutual Fund SIP | दरमहिना 10,000 रुपयांची करा गुंतवणूक, तीन वर्षांत मिळतील 6 लाख रुपये; जाणून घ्या

Related Posts