IMPIMP

Tihar Jail | दिल्‍लीच्या तिहार तुरुंगात गँगस्टर अंकित गुर्जरचा संशयास्पद मृत्यू

by nagesh
Tihar Jail | gangster ankit gurjar who was involved more 24 serious crimes died suspiciously tihar jail delhi

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाTihar Jail । दिल्‍लीच्या तिहार तुरुंगात (Tihar Jail) कैद असलेल्या कुख्यात गँगस्टर अंकित गुर्जरचा (Gangster Ankit Gurjar) संशयास्पद परिस्थितीत मृत्यू (Death) झाल्याची माहिती समोर आली आहे. 8 पेक्षा अधिक हत्येच्या घटनांमध्ये सामील असणारा अंकित सध्या तिहार तुरुंगात कैद होता. अंकितचा तुरुंगातील बॅरक क्रमांक 3 मध्ये मृत्यू झाला. मात्र, अंकितच्या कुटुंबियांनी पोलिसांवर हत्येचा आरोप लावला आहे. तर कैद्यांमध्ये झालेल्या भांडणात अंकितचा मृत्यू झाला असल्याचं पोलिसांनी (Delhi Police) सांगितलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मंगळवारी (3 ऑगस्ट) रोजी पोलिस अधिकारी मीणा (Police Officer Meena) यांना अंकितकडे मोबाइल आढळला होता.
त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली, यावेळी अन्य पोलिसांनी अंकितला बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
सध्या अंकितच्या मृतदेहाला पोस्ट मॉर्टमसाठी (PM) पाठवले असून, पोस्ट मॉर्टमची रिपोर्ट (PM Report) आल्यानंतर हत्येचं नेमंक कारण समजू शकेल.
असं अंकितच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.

 

 

दरम्यान, दिल्‍ली पोलिसांच्या (Delhi Police) स्‍पेशल सेलने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदाअंतर्गत (मोक्का) गुन्हा दाखलहुन गतवर्षी अंकितला पकडलं होतं.
त्याच्यावर 8 पेक्षा अधिक हत्या, वसुली, हत्येचा प्रयत्न, अपहरणा आणि अन्य 24 पेक्षा अधिक गुन्हे दाखल होते. दिल्ली आणि पश्चिम उत्तरप्रदेश मध्ये अंकित गुर्जर आणि त्याची गँग सक्रिय होती.
पोलिसांकडून अंकितवर सव्वा लाख रुपयांचे बक्षीस देखील ठेवण्यात आले होते.

 

 

Web Title : Tihar Jail | gangster ankit gurjar who was involved more 24 serious crimes died suspiciously tihar jail delhi

 

हे देखील वाचा :

Vasai Crime | वसई किनाऱ्यावर आढळला आणखी एका तरुणीचा मृतदेह; परिसरात खळबळ; आठवड्याभरातील दुसरी घटना

Pune News | गणेश बिडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून सभागृह नेते पद रद्द करा; नगरसेविका पल्लवी जावळे यांची मागणी (VIDEO)

Modi Government । मोदी सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ वाहनांसाठी नोंदणी शुल्क आणि RC शुल्क माफ

 

Related Posts