IMPIMP

Parliament Winter Session 2023 | संसदेत शिरून गोंधळ घालणारा एक तरुण महाराष्ट्रातील, घोषणाबाजी केली ”तानाशाही नही चलेंगी”

by sachinsitapure
Lok Sabha News

नवी दिल्ली : सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session 2023) सुरू आहे. आज लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमधून २ तरूणांनी सभागृहात उडी मारली. यानंतर त्यांनी बेंचवर उड्या मारत सभापतींच्या आसनाकडे जाण्याचा प्रयत्न केला. तसेच स्मोक कँडल (Smoke Candles) पेटवल्या. यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. या दोघांना पकडण्यात आले असून आणखी एकाने संसदेच्या (Parliament Winter Session 2023) परिसरात गोंधळ घातला त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

या धक्कादायक घटनेनंतर लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. दरम्यान, गोंधळ घालणारे दोन तरूण आणि एक तरूणी यांच्यापैकी एक तरूण हा महाराष्ट्रातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

महाराष्ट्राशी संबंधीत असलेल्या या तरूणाचे नाव अमोल शिंदे असून, तो लातूर जिल्ह्यातील आहे.
या तिघांनी म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह (MP Pratap Singh) यांच्या नावाच्या पासद्वारे संसदेत प्रवेश मिळवला होता.
संसदेत गोंधळ घालणाऱ्या एका तरुणाचे नाव सागर आहे. या दोघांसोबत असलेल्या महिलेचे नाव नीलम सिंह आहे.
नीलम ही हरियाणातील हिस्सारमधील असल्याचे समजते. (Parliament Winter Session 2023)

दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेस खासदार अधीररंजन चौधरी (Congress MP Adhiraranjan Chaudhary) यांनी
संसदेच्या सुरक्षेमधील ही गंभीर चूक असल्याचा आरोप केला आहे. चौधरी म्हणाले की, दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून
सभागृहात उड्या मारल्या. त्यांनी काही वस्तू फेकल्या ज्यामधून धूर येत होता. या तरुणांना खासदारांनी पकडून
सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिले.

Related Posts