IMPIMP

LPG Cylinder Price | एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी; घरगुती-व्यावसायिक सिलेंडर किती रुपयांना मिळणार?, जाणून घ्या

by nagesh
LPG Cylinder Price | lpg price on 1st july 2023 updated check lpg gas cylinder commercial cylinder latest rates

नवी दिल्ली : LPG Cylinder Price | 1 जुलैपासून एलपीजी सिलेंडरचे (LPG Cylinder Price) नवे दर जाहीर झाले आहेत. इंडियन ऑईलच्या (Indian Oil) वेबसाईटच्या माहितीनुसार, 14.2 किलो एलपीजी (घरगुती) सिलेंडर (Household Cylinder) आणि 19 किलो व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत (Commercial Cylinder) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अर्थात या महिन्यात घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिर असणार आहेत.

केंद्र सरकारने (Central Government) काही महिन्यांच्या कालावधीत व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत (LPG Cylinder Price) बदल केले आहेत. गेल्या महिन्यात जूनमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 83 रुपयांनी कपात करण्यात आली होती. मे महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत घट होऊन एका सिलेंडरची किंमत 1856.50 रुपयांवर पोहोचली होती. एप्रिलमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2028 रुपये होती. मार्चमध्ये त्याची सर्वाधिक किंमत 2119.50 रुपये होती. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1769 रुपये होती. (LPG Cylinder Price on 1st July 2023)

जूनपासूनच घरगुती सिलेंडरचे दर स्थिर…

मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरमध्ये (LPG Cylinder) 50 रुपयांची वाढ झाली होती. गेल्या वर्षी 6 जुलै रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. नवी दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत मार्चपर्यंत 1053 रुपये होती, त्यात 50 रुपयांनी वाढ झाली होती आणि आता घरगुती सिलेंडर 1103 रुपये प्रति सिलेंडर विकला जात आहे.

सध्याचे प्रमुख शहरातील दर काय? (LPG Cylinder Price on 1st July 2023)

नवी दिल्ली – (New Delhi)

घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत – 1103 रुपये
व्यावसायिक सिलेंडरची किंमत -1773 रुपये

मुंबई – (Mumbai)

घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत – 1102.50 रुपये
व्यावसायिक सिलेंडरची किंमत – 1725 रुपये

कोलकाता – (Kolkata)

घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत – 1129 रुपये
व्यावसायिक सिलेंडरची किंमत – 1875.50 रुपये

चेन्नई – (Chennai)

घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत – 1118.50 रुपये
व्यावसायिक सिलेंडरची किंमत – 1937 रुपये

Web Title : LPG Cylinder Price | lpg price on 1st july 2023 updated check lpg gas cylinder commercial cylinder latest rates

Related Posts