IMPIMP

Diamond League 2023 | भालाफेकमध्ये नीरज चोप्रा ‘नंबर वन’; 87.66 मीटरवर भाला फेकत पटकावला ‘लॉसने डायमंड लीग’चा किताब

by nagesh
Diamond League 2023 | neeraj chopra wins gold medal in lausanne diamond league with 86-77 metre throw

नवी दिल्ली : Diamond League 2023 | भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकियो ऑलिम्पिक नंतर आता लॉसने डायमंड लीगचा (Diamond League 2023) खिताब पटकावला आहे. त्याने पुन्हा एकदा भारताच्या (India) शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. (Neeraj Chopra wins Lausanne Diamond League)

नीरज चोप्राने लॉसने डायमंड लीगमध्ये (Diamond League 2023) पहिले स्थान पटकावले आहे. त्याने 87.66 मीटर अंतरावर भालाफेक (87.66m Throw) करून पहिले स्थान पटकावले आहे. या मोसमातील त्याचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी नीरजने दोहा डायमंड लीगमध्ये (Doha Diamond League) भाला 88.67 मीटर फेकून पहिला क्रमांक पटकावला होता.

https://twitter.com/SM_8009/status/1674959630487912448?s=20

नीरज चोप्राने या लीगच्या पाचव्या फेरीत 87.66 मीटर फेक करून हे विजेतेपद पटकावले. दरम्यान, त्याने या फेरीत फाऊलने सुरुवात केली आणि नंतर 83.52 मीटर, त्यानंतर 85.04 मीटर भाला फेक केली. त्यानंतर चौथ्या फेरीत नीरजकडून आणखी एक फाऊल झाला, पण त्याच्या पुढच्याच फेरीत नीरजने 87.66 मीटरवर भाला फेकला. नीरजचा शेवटचा थ्रो 84.15 मीटर होता, पण पाचव्या फेरीत नीरजची बरोबरी कोणताही खेळाडू करू शकला नाही. त्यामुळे नीरजने डायमंड लीगचा खिताब पटकावला.

दोहा येथे आयोजित डायमंड लीग जिंकल्यानंतर नीरजनं भालाफेकच्या क्रमवारीत
आणखी एक यश मिळवले आहे. 22 मे रोजी तो नंबर-1 अ‍ॅथलीट बनला होता.
यासह नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचून देशाचे नाव उंचावले आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा आता भालाफेक
रँकिंगमध्ये नंबर 1 खेळाडू बनला आहे. नीरजनं प्रथमच हे मानांकन मिळवून इतिहास रचला आहे.

Web Title : Diamond League 2023 | neeraj chopra wins gold medal in lausanne diamond league with 86-77 metre throw

Related Posts