IMPIMP

Rules Change | मोबाइल यूजर्ससाठी महत्वाची बातमी ! 1 सप्टेंबरपासून बदलतील ‘हे’ 5 नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता होणार परिणाम

by nagesh
Data Plans For Airtel-Reliance Jio | airtel and reliance jio fifty gb data plans read details about airtel plan vs jio plans

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Rules Change | मोबाइल यूजर्स म्हणजे मोबाइल वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एक सप्टेंबरपासून मोबाइलशी संबंधित पाच मोठे नियम बदलणार (Rules Change) आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. नवीन नियमांनुसार जर मोबाईलवर डिज्नी हॉटस्टार (Disney+ Hotstar) चा वापर करत असाल तर तुमचे रिचार्ज (Mobile Recharge) महागणार आहे.

यासोबत अमेझॉन (Amazon), गुगल (Google), गुगल ड्राइव्ह (Google Drive) सारख्या सेवांच्या नियमात सुद्धा बदल केले जात आहेत. हे बदल 1 आणि 15 सप्टेंबर 2021 पासून लागू होत आहेत. नियमात बदलानंतर मोबाइल यूजर्सला अनेक सवोंसाठी जास्त पैसे मोजावे लागणार (Expensive Services) आहेत.

 

1- बनावट अँड्राईड अ‍ॅपवर प्रतिबंध

गुगलची नवीन पॉलिसी 1 सप्टेंबर 2021 पासून लागू होत आहे. या अंतर्गत फेक कंटेटला प्रमोट करणार्‍या अ‍ॅप्सवर 1 सप्टेंबरपासून प्रतिबंध लावला जाईल. गुगल ड्राइव्ह यूजर्सला 13 सप्टेंबरला नवीन सिक्युरिटी अपडेट मिळेल.

 

 2- फसवणुक करणारे शॉर्ट पर्सनल लोन अ‍ॅप बंद

15 सप्टेंबर 2021 पासून लागू होणार्‍या नवीन नियमांतर्गत गुगल प्ले स्टोअरद्वारे कर्ज देण्याच्या नावावर फसवणुक करणार्‍या शॉर्ट पर्सनल लोन अ‍ॅपवर भारतात प्रतिबंध लावले जातील.

गुगलला अशाप्रकारच्या सुमारे 100 अ‍ॅपबाबत तक्रार मिळाली होती हे अ‍ॅप फसवणूक करत आहेत. मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर गुगलने नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. Xiaomi, Realme सारख्या कंपन्या शॉर्ट पर्सनल लोन अ‍ॅपमध्ये सहभागी आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

3- बदलणार Google Drive

गुगल ड्राइव्ह (Google Drive) यूजर्सला 13 सप्टेंबरला नवीन सिक्युरिटी अपडेट मिळेल. ज्यामूधन Google Drive चा वापर पहिल्याच्या तुलनेत जास्त सुरक्षित होईल.

 

4- OTT अ‍ॅप सबस्क्रीप्शन

भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney plus hotstar) चे सबस्क्रीप्शन 1
सप्टेंबर 2021 पासून महागणार आहे. यानंतर यूजर्सला बेस प्लानसाठी 399 रुपयांऐवजी 499 रुपये द्यावे लागतील.

 

5- अमेझॉनवरून वस्तू मागवणे महागणार

डिझेल आणि पेट्रोल महागल्याने अमेझॉन आपल्या लॉजिस्टिक कॉस्टमध्ये वाढ करू शकते. 1 सप्टेंबर 2021 पासून अमेझॉनवरून सामान मागवणे महागणार आहे. 500 ग्रॅमच्या पॅकेटसाठी 58 रुपये द्यावे लागतील. तर, रिजनल कॉस्ट 36.50 रुपये होईल.

 

Web Title : Rules Change | 5 rules will change 1 september 2021 mobile users know what would be effect you

 

हे देखील वाचा :

MNS DahiHandi | ठाणे, दादरला मनसेचा ‘गमिनी’ कावा करीत मध्यरात्रीच फोडली दहीहंडी

Audi Q3 accident | दुर्दैवी ! ऑडी कारच्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; आमदाराच्या मुलासह सुनेचा समावेश

Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील 4 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

 

Related Posts