IMPIMP

LPG Cylinder Price | ‘एलपीजी’ सिलेंडर आजपासून झाला आणखी महाग , आता ‘या’ किमतीत मिळेल घरगुती गॅस; 15 दिवसात 50 रुपयांची वाढ

by nagesh
LPG Commercial Gas Cylinder Price | commercial gas cylinder price hiked by rupees 43

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LPG Cylinder Price | घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 15 दिवसात विना-अनुदानित एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे. आज म्हणजे एक सप्टेंबरला 25 रुपयांची वाढ करण्यात आली (LPG Cylinder Price) आहे. यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांनी 18 ऑगस्टला गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. दिल्लीत आता 14.2 किलोग्रॅम एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरची किंमत वाढून 884.50 रुपये झाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

प्रमुख शहरात अशा वाढल्या घरगुती LPG सिलेंडरच्या किमती

महीना दिल्ली कोलकाता मुंबई चेन्नई
सप्टेंबर 1, 2021 884.5 911 884.5 900.5
ऑगस्ट 18, 2021 859.5 886 859.5 875
ऑगस्ट 1, 2021 834.5 861 834.5 850
जुलै 1, 2021 834.5 861 834.5 850
जून 1, 2021 809 835.5 809 825
मे 1, 2021 809 835.5 809 825
एप्रिल 1, 2021 809 835.5 809 825
मार्च 1 , 2021 819 845.5 819 835
फेब्रुवारी 25 , 2021 794 820.5 794 810
फेब्रुवारी 15 , 2021 769 795.5 769 785
फेब्रुवारी 4 , 2021 719 745.5 719 735
जानेवारी 1 , 2021 694 720.5 694 710
डिसेंबर 15 , 2020 694 720.5 694 710
डिसेंबर 02 , 2020 644 670.5 644 660
नोव्हेंबर 01 , 2020 594 620.5 594 610
ऑक्टोबर 01 , 2020 594 620.5 594 610
ऑगस्ट 01, 2014 920 964.5 947 922
जानेवारी 1, 2014 1241 1270 1264.5 1234

 

 

स्त्रोत : IOC

जुलै आणि ऑगस्टमध्ये दर वाढले होते. मे  आणि जूनमध्ये घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. एप्रिलमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात 10 रुपयांची कपात केली होती. दिल्लीत यावर्षी जानेवारीत एलपीजी सिलेंडरचा दर 694 रुपये होता, जो फेब्रुवारीत वाढवून 719 रुपये प्रति सिलेंडर करण्यात आला. 15 फेब्रुवारीला दर वाढवून 769 रुपये करण्यात आले. यानंतर 25 फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडरचा दर 794 रुपये करण्यात आला. मार्चमध्ये एलपीजी सिलेंडरची प्राईस 819 रुपये केली गेली.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title : LPG Cylinder Price | lpg cylinder price without subsidy becomes expensive on september 1 now gas will be available at this rate

 

हे देखील वाचा :

Bank Jobs | पदवीधर तरूणांना बँकेत नोकरीची संधी, अकोला जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेत 100 जागांसाठी भरती; जाणून घ्या

Mosquitoes Repellent Plants | घरात आवश्य लावा ‘या’ 5 वनस्पती, ‘मच्छर’ भटकणार नाहीत जवळपास, जाणून घ्या

Rain in Maharashtra | आगामी 24 तासांत राज्यातील ‘या’ जिल्हयांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी ‘धो-धो’

 

Related Posts