IMPIMP

Maharashtra Politics | संभाजी ब्रिगेडचे भाजपसोबत युतीचे ‘संकेत’; महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ?

by nagesh
Maharashtra Politics | maharashtra politics purushottam khedekar signs alliance sambhaji brigade bjp

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनराज्यात मुख्यमंत्रीपदावरून बिनसल्यानंतर शिवसेनेने (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षासोबत आघाडी करुन राज्यात सरकार स्थापन केले. राज्यात भाजप एक नंबरचा पक्ष असतानाही विरोधात बसण्याची वेळ भाजपवर (BJP) आली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठी सत्तापालट झाल्याचे पहायला मिळाले. राज्यातील या राजकीय घडामोडीनंतर आता आगामी काळात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ (Maharashtra Politics) होणार असल्याचे पहायला मिळत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची सर्वात मोठी संघटना असलेली मराठा सेवा संघ (Maratha Seva Sangh) आणि संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Briged) मार्गदर्शक पुरुषोत्तम खेडेकर यांनी भविष्यातील राजकीय घडामोडीवर संकेत दिले आहे. आगामी निवडणुकीत (election) संभाजी ब्रिगेडला भाजप हा देखील एक युतीचा पर्याय असू शकतो असं खेडेकर यांनी म्हटले आहे. मराठा सेवा संघाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांनी लेख लिहून ही भूमिका मांडली आहे. यामध्ये त्यांनी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आगामी काळात भाजपसोबत युती (Alliance) करण्यासाठी सकारात्मक असल्याचे दिसून येते.

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडची विचारधारा RSS विरोधी
पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘मराठा मार्ग’ मासिकामध्ये संपादकीय लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी भाजपसोबतच्या युतीची भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी रेखा खेडेकर (Rekha Khedekar) या भाजपच्या आमदार होत्या. मात्र, तेव्हाही खेडेकर यांनी सातत्याने भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीवर टीका केली होती. खेडेकर आणि भाजप विरोध यांचे अनेक किस्से आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

…तर भाजपसोबत युती होऊ शकते

राजकारणामध्ये कट्टर विरोधक असलेले शिवसेना-काँग्रेस एकत्र येऊ शकतात. तर मग इतरांनी का येऊ नये ? काँग्रेस-राष्ट्रवादी जर संभाजी ब्रिगेडला गृहित धरणार असेल आणि केवळ संभाजी ब्रिगेडच्या नावाचा स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी वापर करत असेल तर संभाजी ब्रिगेडला काही राजकीय तडजोडी करुन वेगळा पर्याय शोधावा लागेल. किमान समान कार्यक्रमाप्रमाणे भाजपसोबत युती होऊ शकते असं संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे (Spokesperson Dr. Shivananda Bhanuse) यांनी सांगितले आहे.

संघटनेच्या 33 विविध संघटना
1 सप्टेंबर 1993 रोजी मराठा सेवा संघाची अकोला याठीकाणी स्थापना करण्यात आली.
मराठा सेवा संघाच्या काळानुसार सलग्न संघटना स्थापन झाल्या.
तरुणाईंसाठी संभाजी ब्रिगेड जी सध्या राजकीय पक्ष म्हणून काम करतेय.
महिलांसाठी जिजाऊ ब्रिगेड (Jijau Brigade) अशा विविध 33 संघटना तयार झाल्या.
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जन्म तारखेचा घोळ मिटवण्यासाठी मराठा सेवा संघाने शासनाला भाग पाडले.
संभाजी ब्रिगेडनं पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटवर (Bhandarkar Institute Pune) केलेला हल्ला राज्यात खूप गाजला होता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title :- Maharashtra Politics | maharashtra politics purushottam khedekar signs alliance sambhaji brigade bjp

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘आयुष’ मंत्रालयाचा संदर्भ देऊन 23 कोटी 45 लाखांची फसवणूक; पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ऋषिकेश पाटणकरला अटक

Manohar Mama Bhosale | मनोहर मामा भोसलेचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

पेन्शनधारकांसाठी खुशखबर ! SBI च्या ‘या’ सर्व्हिसद्वारे घसरबसल्या मिळतील ‘या’ सर्व सुविधा; जाणून घ्या

Related Posts