IMPIMP

Murder in Alandi | तरुणाचे हात-पाय बांधून फेकले इंद्रायणी नदीत, खून प्रकरणात FIR

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

आळंदी (Alandi): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Murder in Alandi | तरुणाचे हात-पाय दोरीने बांधून त्याला इंद्रायणी नदीत फेकून दिले. यामध्ये तरुणाचा मृत्यू (Murder) झाला आहे. हा प्रकार आळंदी पोलीस ठाण्याच्या (Alandi Police Station) हद्दीतील केळगाव येथील इंद्रायणी नदीच्या सिद्धबेट येथील मंदिरामागे सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास उघडकीस आला आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

विनायक बाळासाहेब बोरुडे (वय-24 रा. गोरेगाव ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे खून झालेल्या
तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी केळगावचे पोलीस पाटील युवराज बबन वहीले (Police Patil Yuvraj Vahile) (वय-38) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फीर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळगाव (Kelgaon) येथे सिद्धबेट येथे असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मागे असलेल्या बागेत नागरिक फिरण्यासाठी येत असतात.
सोमवारी मंदिराच्या मागे इंद्रायणी नदीत एक मृतदेह पाण्यावर तरंगताना नागरिकांना आढळून आला. याची माहिती पोलीस पाटील यांना देण्यात आली. पोलीस पाटील वहीले यांची याची माहिती आळंदी पोलीस स्टेशनला दिली.

 

पोलिसांनी इंद्रायणी नदीत तरंगत असलेल्या तरुणाचा मृतदेह (Deadbody) बाहेर काढला.
मयत तरुणाचे हात-पाय लाल व पिवळ्या रंगाच्या धाग्याने बांधलेल्या अवस्थेत होते.
त्याचे हात-पाय बांधून त्याला नदी पात्रात फेकून खून केला.
याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन आळदी पोलीसंनी पुढील तपास सुरु केला आहे.

 

Web Title :- Murder in Alandi | Young man’s hands and feet tied and thrown in Indrayani river, FIR in murder case

 

हे देखील वाचा :

State Board CET 2021 | अकरावीसाठीची CET परीक्षा रद्द, 10 वीच्या गुणांवर प्रवेश; हाय कोर्टाचे निर्देश

Shriguru Balaji Tambe | आयुर्वेदाचार्य श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचे 81 वर्षी निधन

Pimpri Police | आर्मी इंटलिजन्सची पिंपरी-चिंचवड पोलिसांवर तीव्र ‘नाराजी’, जबाबदार कोण?

 

Related Posts