IMPIMP

Shriguru Balaji Tambe | आयुर्वेदाचार्य श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचे 81 वर्षी निधन

by nagesh
Ayurveda Expert Balaji Tambe | renowned ayurvedacharya balaji tambe died of coronavirus

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–  आयुर्वेद (Ayurveda) आणि योग शिक्षणाच्या (Yoga education) माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेल्या श्रीगुरु बालाजी तांबे (Shriguru Balaji Tambe) यांचे आज (मंगळवार) वयाच्या 81 वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल आणि संजय, स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे. बालाजी तांबे (Shriguru Balaji Tambe) यांची मागील आठवड्यात प्रकृती खाल्याने त्यांच्यावर पुण्यातील (Pune) एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

बालाजी तांबे यांनी आयुर्वेद, अध्यात्म व संगीतोपचार (music therapy) यांचा पाच दशकाहून अधिक काळ प्रचार व प्रसार केला. त्यांनी विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. शास्त्रशुद्ध आणि गुणवत्तापूर्ण आयुर्वेदिक औषधांचे त्यांनी संशोधन व निर्मिती (Research and production) करुन ती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवली होती. नागरिकांमध्ये आयुर्वेदाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.यातून विविध समाज घटकांना आयुर्वेदाशी जोडले.

बालाजी तांबे यांनी केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील आयुर्वेदाचा प्रचार केला.
त्यांनी लोणावळ्याजवळील (Lonavala) कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाबद्दल जनजागृती केली.
यानिमित्ताने अभिनेते, संगीत साहित्य, राजकीय नेते, कला अशा क्षेत्रातील अनेक दिग्गज आश्रमाला भेट देत होते.
याशिवाय त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी परदेशातून देखील अनेक लोक आश्रमात येत असत.

 

Web Title : Pune News | shri guru balaji tambe passes away he is 81 years old

 

हे देखील वाचा :

Pimpri Police | आर्मी इंटलिजन्सची पिंपरी-चिंचवड पोलिसांवर तीव्र ‘नाराजी’, जबाबदार कोण?

Pune Corporation | विठ्ठलवाडी ते नांदेड सिटी आणि वारजे ते शिवणे नदी काठावरून उड्डाणपुल ! पुणे महापालिकेकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू

Mumbai High Court | राज्यातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला न्यायालयाने दिली स्थगिती

 

 

Related Posts