IMPIMP

Driving Licence | सरकारचा मोठा निर्णय ! ड्रायव्हिंग लायसन्सचे बदलले नियम, आता एनजीओ आणि खाजगी कंपन्यासुद्धा जारी करू शकतील DL

by nagesh
Driving Licence | driving license new rules 2021 driving license new rules in india auto makers ngos allowed to run driver training centres

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Driving Licence | आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे खुप सोपे झाले आहे. रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्याच्या सध्याच्या नियमांमध्ये बदल (changes to the rules for issuing driving license) करून ते सोपे केले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

नवीन नियमानुसार, खासगी वाहन उत्पादक, ऑटोमोबाइल असोसिएशन, विना अनुदानित संस्था (एनजीओ) किंवा कायदेशीर खासगी फर्मसह विविध संस्थांना मान्यप्राप्त ड्रायव्हर प्रशिक्षण केंद्र चालवण्याची परवानगी दिली आहे (private organizations allowed to run driver training centers)

 

नंतर या संस्था ठराविक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स जारी करू शकतील.
रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

 

मंत्रालयाकडून जारी मार्गदर्शक तत्वांनुसार ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्याच्या नवीन सुविधेसह प्रादेशिक परिवहन कार्यालयांद्वारे (आरटीओ) ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्याची प्रक्रिया सुद्धा जारी राहील.

 

मंत्रालयाने दोन ऑगस्ट 2021 ला जारी वक्तव्यात म्हटले आहे की, वैध संस्था जसे कंपन्या,
विना सरकारी संस्था, खासगी प्रतिष्ठान/ऑटोमोबाइल असोसिएशन/वाहन निर्माता संघ/स्वायत्त गट/खासगी वाहन उत्पादक, चालक प्रशिक्षण केंद्राच्या (डीटीसी) मान्यतेसाठी अर्ज करू शकतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

मंत्रालयाद्वारे अधिसूचित करण्यात आलेल्या या संस्था प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे (आरटीओ)
ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्याच्या सध्याच्या सुविधेसह ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यात सक्षम असतील.

परिवहन मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये पुढे म्हटले आहे की, यासाठी अर्ज करणारे कायदेशीर
युनिट म्हणजे वैध संस्थांकडे केंद्रीय मोटर वाहन नियम (सीएमव्ही) नियम, 1989 च्या अंतर्गत
निर्धारित भूमीवर आवश्यक मुलभूत संरचना किंवा सुविधा असाव्यात. त्यांच्याकडे स्थापनेनंतर
एक स्पष्ट रेकॉर्डसुद्धा असावे.
अर्जदारांना राज्य / केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्र चालवण्यासाठी संस्थाना व्यवस्थापन करण्यासाठी आपली आर्थिक क्षमता दाखवावी लागेल.

मंत्रालयाने म्हटले की, जेव्हा एखादी संस्था ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी अर्ज करते.
तेव्हा संबंधीत अधिकारी अर्ज मिळाल्याच्या 60 दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण करेल.
मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्रांना संबंधीत प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) / जिल्हा परिवहन कार्यालयाकडे (डीटीओ) वार्षिक परफॉर्मन्स रिपोर्ट जमा करावा लागेल.

सरकारच्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार राज्य सरकारांना मान्यता प्राप्त चालक प्रशिक्षण
केंद्र आणि मान्यता प्रदान करण्याच्या तंत्राच्या तरतुदींचा व्यापक प्रचार करावा लागेल.
केंद्र सरकार अशा मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग केंद्रांना कोणतीही आर्थिक मदत किंवा
अनुदान देणार नाही.
मात्र, संस्था कॉर्पोरेट क्षेत्राकडून किंवा केंद्र किंवा राज्य सरकारच्या एखाद्या योजनेंतर्गत
किंवा कॉर्पोरेटच्या समाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत मदत मागू शकतात.

 

Web Title : Driving Licence | driving license new rules 2021 driving license new rules in india auto makers ngos allowed to run driver training centres

 

हे देखील वाचा :

Airbags | सरकारचा नवीन प्रस्ताव ! कारमध्ये किमान 6 एयरबॅग असाव्यात, परिणाम – किंमत 30 ते 50 हजाराने वाढणार

Pune Police | आयुक्तालयातील 145 पोलिस शिपाई ते सहाय्यक उपनिरीक्षकांच्या बदल्या, काही जणांच्या बदलीला स्थगिती

Pune Crime | सराईत गुन्हेगार ओंकार बाणखेले खूनप्रकरणी 7 जणांना अटक

Amruta Fadnavis | ‘गणेश चतुर्थीच्या अगोदर माझं एक गाणं येणार’

 

Related Posts