IMPIMP

MPSC Result 2023 | पोलीस उपनिरीक्षक पदाची तात्पुरती गुणवत्ता यादी एमपीएससीकडून जाहीर

by nagesh
MPSC Result 2023 | psi result provisional list declared by mpsc marathi news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – MPSC Result 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक’ (Police Sub Inspector (PSI) पदाच्या परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी (Quality List) आज (मंगळवार) जाहीर करण्यात आली आहे. एमपीएससीने (MPSC Result 2023) ट्विट करुन ही माहिती दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 650 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली.

पात्र उमेदवारांची तात्पुरती गुणवता यादी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गासाठी (EWS) राखीव असलेल्या 65 पदांचा निकाल (MPSC Result 2023) राखीव ठेवून तात्पुरती निवड यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. याआधारे उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प आयोगाकडून मागवण्यात आला आहे.

https://twitter.com/mpsc_office/status/1676168360005103617?s=20

या परिक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES या मेनूमध्ये ‘Post Preference/Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही वेबलिंक बुधवार दि.5 जुलै 2023 रोजी दुपारी 12.00 पासून दि 11 जुलै 2023 रोजी रात्री 11.59 पर्यंत सुरु राहणार आहे.

उमेदवाराकडून विकल्प प्राप्त झाल्यानंतर आवश्यक तपासणीनंतर अंतिम गुणवत्ता यादी
व अंतिम निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
ऑनलाईन पद्धती खेरीज इतर कोणत्याही प्रकारे पाठवलेला भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा
पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही, असे एमपीएससी कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Web Title : MPSC Result 2023 | psi result provisional list declared by mpsc marathi news

Related Posts