IMPIMP

Eta Variant of Covid-19 | नवं संकट ! कर्नाटकमध्ये समोर आला कोरोना व्हायरसचा ‘Eta व्हेरिएंट’, जाणून घ्या किती आहे धोकादायक

by nagesh
Coronavirus | corona can spread even after keeping a distance of 6 feet inside the house claims in the study

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Eta Variant of Covid-19 | कोरोना महामारीचा नवनवीन व्हेरिएंट समोर आल्यानंतर जगभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय जगतातील शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंटला (Delta) जबाबदार ठरवण्यात आले होते. आता कर्नाटकमध्ये कोरोना व्हायरसचा एटा व्हेरिएंट (Eta Variant of Covid-19) समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कर्नाटकच्या मंगळुरुमध्ये कोरोना व्हायरसच्या एटा स्ट्रेन व्हेरिएंटच्या एका प्रकरणाला दुजोरा मिळाला आहे. शास्त्रज्ञ ही माहिती जमा करण्याच्या प्रयत्नात आहे की, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेशी या व्हेरिएंटचे काही कनेक्शन आहे का. भारतात आतापर्यंत अल्फा व्हेरिएंट (Alpha Variant) आणि डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) ने धुमाकुळ घातला आहे.

 

महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने एक दिवसापूर्वी एका रूग्णाचा मृत्यू झाला. डेल्टा प्लस व्हेरिएंटने महाराष्ट्रातील हा तिसरा मृत्यू आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटने पहिला मृत्यू रत्नागिरी तसेच दुसरा मृत्यू मुंबईत रिपोर्ट केला गेला होता. रायगड जिल्ह्याच्या कलेक्टरने डेल्टा प्लस व्हेरिएंटने 69 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

यापूर्वी मुंबईत डेल्टा प्लस व्हेरिएंटने एका 63 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला होता.
या महिलेने व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतले होते, तरी सुद्धा कोरोनाने तिचा मृत्यू झाला.
21 जुलैला ती कोरोना पॉझिटिव्ह आली होती. यानंतर 27 जुलैला तिचे निधन झाले होते.

 

कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसात एकुण 543 मुले कोविड पॉझिटिव्ह आढळली.
एकुण 543 पैकी 270 मुली आणि 273 मुले आहेत.
बंगळुरू महानगरपालिका (बीबीएमपी) ने सांगितले की, 502 मुलांमध्ये हलकी लक्षणे होती.
कोरोना व्हायरसने संक्रमित मुले 0-19 वर्ष वयोगटातील आहेत
आणि ही संख्या बेंगळुरूच्या दैनिक कोविड गणनेच्या 12-14 टक्के भाग आहे.

 

 

Web Title :- Eta Variant of Covid-19 | coronavirus eta variant of covid 19 surfaced in karnataka know how dangerous it is

 

हे देखील वाचा :

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात एंट्रीसाठी दोन्ही ‘डोस’ आवश्यक, RTPCR रिपोर्ट नसेल तर 14 दिवस राहावे लागेल ‘क्वारंटाइन’

Pune Crime | इंस्टाग्रामवर ‘त्या’ महिलेशी झालेली ओळख तरुणाला महागात पडली, महिलेनं ठेवले जबरदस्तीने ‘संबंध’; पण…

FYJC Admission 2021 | अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक अखेर जाहीर ! प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु, जाणून घ्या कशी असेल प्रवेश प्रक्रिया

 

Related Posts