IMPIMP

Devendra Fadnavis | लोकसभा, विधानसभेला भाजपा किती जागा लढणार, देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती, म्हणाले…

by sachinsitapure
Lok Sabha and Assembly Election 2023

नागपूर : Devendra Fadnavis | आपण लोकसभेसह (Lok Sabha Election 2023) विधानसभेच्या निवडणुकाही (Assembly Election 2023) महायुतीमधील तीनही पक्ष एकत्र लढणार आहोत. आपला विजय होणार असला तरी गाफील राहू नका, असे आवाहन भाजपा (BJP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

ते नागपुरातील कोराडी येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकांबाबत मार्गदर्शन केले.

फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, महाविजय २०२४ अभियानाच्या दृष्टीने खालपर्यंत संघटनेची रचना तयार
केली आहे. विजयाची भावना घेऊन मैदानात उतरू या, मात्र अतिआत्मविश्वास ठेवू नका.

फडणवीस म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी पुढील नऊ ते दहा महिने सर्वांनी पक्षासाठी द्यावे.
महायुतीमधील तीनही पक्ष दोन्ही निवडणुका एकत्र लढतील. तुमच्या मनात असतील तेवढ्या जागा आपल्याला मिळणारच,
त्यामुळे ती चिंता करू नका.

Related Posts