IMPIMP

IMD Alert | पुढील काही तासात पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ‘या’ 9 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

by nagesh
Rain in Maharashtra | pune news signs of rain re activating across the state

पुणे (Pune) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online): IMD Alert | मागील आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) झोडपून काढले. त्यानंतर आता राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाकडून (IMD) वेळोवेळी पावसाचा इशारा (IMD Alert) दिला जातो. आज राज्यातील 9 जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (IMD Alert) पडण्याची शक्यता आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

आज पुण्यासह ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि नंदुरबार या नऊ जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Light to moderate rain) पडेल. तर उर्वरीत महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता खूपच कमी आहे. आजपासून पुढील पाच दिवस हीच स्थिती राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

 

पुढील काही तासात मुसळधार

काही तासात पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, पालघर आणि घाट परिसरात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासूनच या जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची (Cloudy weather) नोंद झाली आह. सायंकाळनंतर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर मुंबईत आज अंशत: ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून मुंबईत पावसाची शक्यता कमी आहे.

 

 

पुढील 5 दिवस पावसाचा जोर कमी

मागील काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता
सध्या कमी झाली आहे. याशिवय कोकण किनारपट्टीला (Konkan coast) समांतर असलेला
हवेचा कमी दाबाच्या पट्याचा प्रभाव देखील कमी झाला आहे. यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावरील
पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील पाच दिवस हीच स्थिती कायम राहणार आहे.

 

Web Title : imd alert weather forecast today moderate to intense spell of rain in pune today imd alerts nine district today

 

हे देखील वाचा :

SBI ने सुरक्षित ऑनलाइन बँकिंगसाठी Yono Lite App मध्ये दिले एक नवीन फीचर, जाणून घ्या डिटेल

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच; पुन्हा एकदा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Sangli News | पुराबरोबर आलेली मगर पाणी ओसरल्यानंतरही घराच्या छतावरच अडकून राहिली

 

Related Posts