IMPIMP

PM Kisan | आता ‘या’ शेतकर्‍यांवर कारवाईची तयारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ; परत करावी लागेल रक्कम

by nagesh
PM Kisan | good news pm kisan beneficiaries will get credit of rs 4000 instead of 2000 in 10th installment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : PM Kisan सन्मान निधी योजनेचा लाभ असेही लोक घेत आहेत जे तिच्या कक्षेत येत नाहीत. आता त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. केंद्र सरकार 42 लाख अपात्र शेतकर्‍यांकडून 3,000 कोटी रुपये वसूल करणार आहे. हा तो पैसा आहे जो PM Kisan योजनेंतर्गत अपात्र लोकांनी घेतला आहे. एकट्या उत्तर प्रदेशात 7.10 लाख अपात्र शेतकर्‍यांनी लाभ घेतला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आसामध्ये पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) अपात्र शेतकर्‍यांकडून 554 कोटी, उत्तर प्रदेशच्या आपात्र शेतकर्‍यांकडून 558 कोटी, बिहारच्या शेतकर्‍यांकडून 425 कोटी आणि पंजाबच्या अपात्र शेतकर्‍यांकडून 437 कोटी वसूल केले जातील. उत्तर प्रदेश 2.34 शेतकरी असेल आढळले आहेत जे टॅक्सपेयर आहेत. सोबतच 32,300 असे आहेत जे जिवंत नाही. इतकेच नव्हे तर, 3,86,000 लोकांनी बनावट आधार दिले आहे. 57,900 असे आहेत ज्यांना इतर कारणामुळे योजनेच्या बाहेर काढले आहे.

 

 

 

या लोकांना मिळत नाही योजनेचा लाभ

 

1. कुटुंबातील कुणीही सदस्य टॅक्स भरत असेल.

2. जमीन कृषी योग्य नसेल. व्यावसायिक वापर असेल.

3. जमीन आजोबा, वडील किंवा इतरांच्या नावावर असेल.

4. दुसर्‍याची शेती करत असाल.

5. सरकारी नोकरी करणारे

6. विद्यमान किंवाम माजी खासदार, आमदार, मंत्री.

7. प्रोफेशनल रजिस्टर्ड डॉक्टर, इंजिनियर, वकील, चार्टर्ड अकाउन्टंट

8. महिन्याला 10,000 रुपये पेन्शन असेल.

9. इन्कम टॅक्स जमा केला असेल.

10. नगर परिषद विद्यमान किंवा माजी अध्यक्ष, जिल्हा, पंचायत समिती माजी किंवा विद्यमान अध्यक्ष.

11. केंद्र सरकार/ राज्य सरकार आणि PSUs चे विद्यमान किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ / चतुर्थ श्रेणी आणि ग्रुप डी कर्मचारी सोडून)

 

 

 

Web Title : PM Kisan | pm kisan govt will recover money from ineligible farmers

 

हे देखील वाचा :

Pune Metro | ‘लवकरच प्रत्यक्ष मेट्रोत बसायला मिळावे, वनाज ते रामवाडी जून 22 पर्यंत पूर्ण करणार’ !

Anti Corruption | गुटका विक्रीला ‘अभय’ देण्यासाठी 40 हजारांची लाच; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदार अटकेत, अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई

Pune News | पुण्यात बेकायदेशीररित्या 830 प्रकरणांची दस्तनोंदणी; 2 अधिकारी तडकाफडकी निलंबीत

 

Related Posts