IMPIMP

Maharashtra Police News | पोलीस अधीक्षकांचा कारवाईचा बडगा ! कर्तव्यात कसूर करणाऱ्या 123 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई, पोलीस दलात प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन  Maharashtra Police News | कर्तव्य बजावत असताना दिलेले काम वेळेत पूर्ण न करणे, गुन्ह्यांच्या तपासाला उशीर करणे, गुन्हे निकाली न काढणे इत्याबाबतीत कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस अधीक्षकांनी 30 पोलीस अधिकारी आणि 93 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई (SP Strict Action) केली आहे. मागील अनेक वर्षात अशा प्रकारची झालेली ही पहिली कारवाई आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ (Maharashtra Police News) उडाली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले, की कारवाई करणे हा प्रमुख उद्देश नाही. गुन्हा घडल्यानंतर त्याचा योग्य पद्धतीने तातडीने नपटारा करणे, या जबाबदारीचे भान असणे गरजेचे (responsibility is important) आहे, हा या कारवाईमागचा प्रमुख उद्देश आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये (Ahmednagar district) मागील 10 वर्षात जे गुन्हे (FIR) दाखल आहे, त्यांचा वेळेत तपास होणे गरजेचे आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर कायद्याच्या चौकटीत राहून त्याचा निपटारा कसा करायचा याचे नियम घालून दिले आहेत.
मात्र, याचे अनेक ठिकाणी उल्लंघन होताना दिसून आले. जिल्ह्यामध्ये मागील 10 वर्षात 50 हजाराहून अधिक गुन्हे प्रलंबित होते.
यामध्ये तब्बल 2 हजार गुन्हे हे गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. (Maharashtra Police News)

पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पोलिसांना प्रलंबित गुन्हे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले होते. तसचे जे गुन्हे गहाळ झाले आहेत, त्याचा शोध घेण्यास सांगितले होते.
ही मोहिम मागील 8 महिन्यापासून सुरु आहे. अनेक गुन्ह्यांचा निपटारा झाला असून 12 हजार 019 गुन्हे प्रलंबित (pending) राहिले आहे.
प्रलंबित गुन्हे हे गुन्हा दाखल झाल्यानंतर वेळेत तपास न करणे, दोषारोपपत्र (Indictment) वेळेत न्यायालयात दाखल न करणे, प्रकरणे निकाली न काढणे यामुळे हे गुन्हे प्रलंबित आहेत.

गुन्हे निकाली काढण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली आहे.
यामध्ये पोलीस निरीक्षक (Police Inspector), सहायक पोलीस निरीक्षकांचा (API) समावेश आहे.
यातील काहींना दोनवेळा नोटीस देखील देण्यात आली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले की, मागील आठ महिन्यापासून जे गुन्हे प्रलंबित आहेत, त्याच निपटारा करण्याचे आदेश दिले होते.
अनेकांनी तपास केलेला आहे. अनेक अर्ज गहाळ झाले होते, ते अर्ज पुन्हा निर्गमित करुन त्या गुन्ह्याचा तपास केला आहे.
परंतु ज्यांनी कर्तव्यात कसूर केला आहे, अशांवर कारवाई करण्यात आली आहे.
तसेच आता अर्ज न घेता थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title :  Maharashtra Police News | ahmednagar Superintendent of Police manoj patil is in action! 123 police officers on duty, action on staff, huge uproar in police force

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | ‘मी पुन्हा येईन’.. या वाक्यावरून जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

Maharashtra Rains | …म्हणून आगामी 4 दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Brain-Eating Amoeba | मुलाच्या शरीरात शिरला असा ’किडा’, खाऊन टाकले मेंदूच्या आतील सर्वकाही! डॉक्टरसुद्धा वाचवू शकले नाही जीव

 

Related Posts