IMPIMP

Pune – Nashik Highway Accident | कारवर ट्रक उलटल्याने चौघांचा मृत्यु; पुणे – नाशिक महामार्गावरील घटना, महिलेसह २ वर्षाच्या मुलीचा समावेश

by sachinsitapure
Pune Accident News

संगमनेर : सरकारसत्ता ऑनलाईन – पुण्याहून अकोले येथे जात असलेल्या कारवर ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात (Pune – Nashik Highway Accident) कारमधील चौघांचा मृत्यु झाला. त्यात दोन वर्षाची मुलगी, महिला यांचा समावेश आहे. (Pune – Nashik Highway Accident)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

ओजस्वी धारणकर (वय २), आशा सुनील धारणकर (वय ४२), सुनील धारणकर आणि अभय सुरेश विसाळ (वय ४८) अशी अपघातात मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. हा अपघात पुणे -नाशिक महामार्गावर नाशिक लेनवर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावाच्या शिवारात रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला. अस्मिता अभय विसाळ या जखमी झाल्या आहेत.

ट्रकमधील पाईप रस्त्यावर

कारमधून पाच जण प्रवास करत होते. ट्रक आणि कार ही दोन्ही अपघातग्रस्त वाहने पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात होती. चंदनापुरी गावच्या शिवारात धावता आयशर ट्रक बाजूने चाललेल्या कारवर उलटला. हा अपघात इतका भीषण होता, या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातग्रस्त ट्रकमधून लोखंडी पाईप वाहून नेण्यात येत होते. अपघातानंतर ट्रकमधील अनेक पाईप नाशिक-पुणे महामार्गावर पडले होते. ट्रकचालक ओव्हरटेक करत असताना हा अपघात (Pune – Nashik Highway Accident) घडल्याची परिसरात चर्चा आहे. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला.

मृत्युला जणू आमंत्रण

अभय विसाळ आणि धारणकर हे कुटुंबिय पुण्यात कौटुंबिक कार्यक्रमासाठी नातेवाईकांकडे आले होते. अभय विसाळ व त्यांची पत्नी रविवारी सायंकाळी बसने जाण्यासाठी एस टी बसस्थानकावर आले होते. त्यावेळी त्यांना धारणकर यांचा फोन आला. आम्ही नाशिकला चाललो असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर ते बसऐवजी धारणकर यांच्या कारमध्ये बसले. पुढे ही कार अपघातात सापडली.

अपघात घडल्यानंतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या,
वाहतूक कोंडी (Traffic Jam) कशामुळे झाली. हे पाहण्यासाठी मयत अभय विसाळ यांचे भाऊ गेले असता
भावाच्याच वाहनाचा अपघात घडल्याचे त्यांना दिसून आले.
अपघातात मयत झालेल्या अभय विसाळ यांचे अकोले शहरात अगस्ती
कमानीजवळ कचोरी-भेळीचे प्रसिद्ध दुकान आहे.
विसाळ आणि धारणकर कुटुंबीयांची घरे जवळ-जवळच आहे.
अभय विसाळ हे अकोले शहरातील अजिंक्य क्रिकेट क्लबचे सदस्य आणि अष्टपैलू खेळाडू होते.

Related Posts