IMPIMP

Pune Police Recruitment | मुंबईच्या धर्तीवर पुणे पोलीस दलात भरणार कंत्राटी पद्धतीने पोलीस कर्मचारी

by nagesh
Pune Police Recruitment | Police personnel will be recruited in Pune police force on the lines of Mumbai on contract basis

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police Recruitment | शहर पोलिस दलात नव्याने ७ पोलीस ठाण्यांची निर्मिती होणार असून त्यासाठी नवीन मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. सध्याच मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्था राबविताना पोलीस अंमलदारांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे मुंबई पोलिस (Mumbai Police) आयुक्तालयाच्या धर्तीवर पुणे शहर पोलीस दलात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळांकडून कंत्राटी पोलीस कर्मचारी भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. (Pune Police Recruitment)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

काही दिवसांपूर्वी सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आला होता. त्यावेळी पेरुगेट पोलीस चौकीत (Perugate Police Chowki) कोणीही पोलीस कर्मचारी उपलब्ध नव्हता. एकाच कर्मचार्‍यांवर दोन पोलीस चौक्यांचा भार असल्याचे आढळून आल्याने अपुर्‍या पोलीस कर्मचार्‍यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पुणे शहर पोलीस दलात सध्या ७ हजार पोलीस कर्मचारी आहेत. त्यातून दर महिन्याला काही कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. सध्या ८०० नवीन पोलीस अंमलदारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून सध्या ते प्रशिक्षणावर आहेत. (Pune Police Recruitment)

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर ३ हजार पोलीस कर्मचार्‍यांची कमतरता आहे. सर्व विहित मार्गाने भरती प्रक्रिया व प्रशिक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्ष कर्तव्यासाठी २ वर्षानंतर आयुक्तालयास उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची ही कमतरता भरुन काढण्यासाठी ३ हजार कर्मचारी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या कर्मचार्‍यांची मुदत ११ महिन्यांची राहणार आहे. तसा आदेश काढण्यात आला आहे.

याबाबत पुणे पोलीस आयुक्त रितेशकुमार (IPS Ritesh Kumar)
यांनी सांगितले की, मुंबई पोलीस आयुक्तालयाला अशा प्रकारे मनुष्यबळ
भरण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती झाली आहे.
त्यांनी कशा प्रकारे प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठविला होता,
याची माहिती घेण्यात येईल. पुणे शहर पोलीस आयुक्तालयात नवीन
७ पोलीस ठाण्यांची निर्मिती लवकरच होणार आहे. शासनाकडे तसा प्रस्ताव गेला आहे.
त्याला तत्वत: मान्यता मिळाली आहे. त्याची अधिकृत तांत्रिक मान्यता मिळल्यानंतर नवीन मनुष्यबळाची
आवश्यकता लागणार आहे, त्याचा सर्वाणिक विचार करुन मुंबई प्रमाणे मनुष्यबळासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

Web Title :  Pune Police Recruitment | Police personnel will be recruited in Pune police force on the lines of Mumbai on contract basis


हे देखील वाचा

 

Related Posts