IMPIMP

Beed Crime News | पत्नीचं शेजार्‍याशी ‘झेंगाट’ असल्याचं पतीला समजलं, बायकोच्या अनैतिक संबंधास कंटाळून 37 वर्षीय नवर्‍यानं केलं ‘हे’ कृत्य

by nagesh
Beed Crime News | wifes immoral relationship with neighbors husband commits suicide in beed crime news beed police

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन Beed Crime News | पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास (Suicide) घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. 37 वर्षीय नवर्‍याने आत्महत्या केली आहे. दरम्यान पोलिसांना उल्हास पवार यांच्या खिशात सुसाईड नोट (Suicide Note) सापडली आहे. (Beed Crime News)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आत्महत्या केलेल्या 37 वर्षीय नवर्‍यास पत्नीचे घराशेजारीच राहणाऱ्या एका तरुणाबरोबर अनैतिकसंबंध असल्याचे समजले होते. त्यांनी समज देऊनही पत्नीनं शेजारील तरुणासोबत प्रेमसंबंध सुरूच ठेवले. या प्रकाराला ते वैतागले होते. गुरुवारी रात्री त्यांनी राहत्या घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.

घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी (Beed Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना त्यांच्या खिशात एक सुसाईड नोट आढळली आहे. त्यामध्ये आत्महत्येचं कारण लिहिलं असून पत्नीचं घराशेजारी राहणाऱ्या तरुणाबरोबर अनैतिक संबंध सुरू असल्याचा उल्लेख केला आहे. दरम्यान पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

 

Web Title : Beed Crime News | wifes immoral relationship with neighbors husband commits suicide in beed crime news beed police

 

हे देखील वाचा :

PIB Fact Check | मतदान केले नाही तर बँक अकाऊंटमधून कट होतील 350 रुपये? जाणून घ्या वायरल मेसेजचे पूर्ण ‘सत्य’

Devendra Fadnavis | पुणे मनपावर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा फडकणारच – देवेंद्र फडणवीस

Sourav Ganguly | सौरव गांगुलींच्या टीमवर सचिव जय शहांची बॉलिंग पडली भारी, फक्त एका रनाने पराभव

 

Related Posts