IMPIMP

Sourav Ganguly | सौरव गांगुलींच्या टीमवर सचिव जय शहांची बॉलिंग पडली भारी, फक्त एका रनाने पराभव

by nagesh
Sourav Ganguly | bcci agm festival match jay shah picks 3 wickets sourav ganguly teamfalls short by 1 run

कोलकाता : वृत्तसंस्था BCCI ची सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडणार आहे. या बैठकीच्या आदल्या दिवशी इडन गार्डन्सवर (Eden Gardens) 15-15 ओव्हर्सची मॅच खेळवण्यात आली. शेवटपर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये बीसीसीआय अध्यक्षांच्या टीमचा जय शहा (Jay Shah) यांच्या कॅप्टनसीखालील सचिवांच्या टीमनी फक्त 1 रननं पराभव केला. बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कॅप्टन सौरव गांगुली (Sourav Ganguly) या मॅचमध्ये सहाव्या क्रमांकावर उतरले. त्यांनी 20 बॉलमध्ये 2 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 35 रन काढले. त्यानंतर त्यांना नियमाप्रमाणे रिटायर व्हावं लागलं. गांगुली (Sourav Ganguly) रिटायर झाल्याचा फटका त्यांच्या टीमला बसला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

कोलकाताचे इडन गार्डन्स हे सौरव गांगुली यांचे होम ग्राऊंड आहे. या ग्राउंडवर जय शहा यांनी स्पिन बॉलिंगने 7 ओव्हर्समध्ये 58 रन देत 3 विकेट्स घेतल्या. त्यांच्या बॉलिंगमुळेच शहा यांच्या टीमला 128 रनचा बचाव करता आला. जय शहा यांनी आपल्या स्पिन बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन (Former Team India captain Mohammad Azharuddin),गोवा क्रिकेट असोसिएशनचे सूरज लोटलिकर (Suraj Lotlikar of Goa Cricket Association),बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अविषेक दालमिया (Bengal Cricket Association President Avishek Dalmiya) यांची विकेट घेत गांगुलीच्या टीमला जोरदार धक्का दिला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

यानंतर सहाव्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या गांगुली (Sourav Ganguly) यांनी चांगली फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी 2 बॉलवर बाहेर येत ऑफ साईडला टोलेबाजी केली. त्याअगोदर बीसीसीआय सचिवांच्या टीमकडून अरुण धूमल (Arun Dhumal) आणि जयदेव शाह (Jaydev Shah) यांनी 92 रनची पार्टनरशिप करत 15 ओव्हर्समध्ये 3 बाद 128 रन केले. तर बीसीसीआयचे आताचे सचिव जय शहा 10 रन काढून नाबाद राहिले. या सामन्यात बीसीसीआय अध्यक्षांच्या टीमकडून गांगुली यांना 1 विकेट मिळाली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

Web Title : Sourav Ganguly | bcci agm festival match jay shah picks 3 wickets sourav ganguly teamfalls short by 1 run

 

हे देखील वाचा :

Omicron Covid Variant | ‘ओमायक्रॉन सर्वांना मारुन टाकेल, आता मृतदेह नाही मोजायचे’ ! मेडिकलच्या प्राध्यापकाने केली पत्नी, दोन मुलाची हत्या; ‘नोट’ लिहून झाला फरार

Crime News | धक्कादायक ! Facebook वर मैत्री झाली अन् गुंगीचं औषध पाजून केला बलात्कार, अत्याचाराचा व्हिडीओ पाठवून मागितले 10 लाख

Hanuma Vihari | टीम इंडियाने दुर्लक्षित केलेल्या हनुमा विहारीची आफ्रिकेत ‘कमाल’

 

Related Posts