IMPIMP

ACB Trap On Police Inspector | स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by sachinsitapure

धुळे : सरकारसत्ता ऑनलाइन – ACB Trap On Police Inspector | प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपये लाच मगून दीड लाख रुपये लाच स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकासह (LCB PI Dhule) दोन पोलीस हवालदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.1) रात्री करण्यात आली. एसीबीच्या कारवाईमुळे धुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Dhule ACB Trap)

स्थानिक गुन्हे शाखा, धुळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे PI Dattatraya Sakharam Shinde (रा. सम्राट चौक, शाहू कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 2, बीड), पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने Nitin Anandrao Mohane (रा. प्लॉट नंबर 58, गंदमाळी सोसायटी, देवपूर, धुळे), अशोक साहेबराव पाटील Ashok Sahebrao Patil (वय 45 रा. प्लॉट नंबर 25, मधुमंदा सोसायटी, नकाने रोड, देवपूर, धुळे) अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. याबाबत 35 वर्षाय व्यक्तीने धुळे एसीबीकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. तसेच लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवून ही रक्कम पोलीस हवालदार नितीन मोहने व अशोक पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदार यांनी पोलीस हवालदार मोहने व पाटील यांच्यासोबत चर्चा करुन तडजोडी अंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत एसीबी कार्य़ालयता जाऊन तक्रार केली.

प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम पोलीस हवालदार यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार यांच्याकडून तडजोडी अंती ठरलेली दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना पोलीस हवालदार नितीन मोहने व अशोक पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले.आरोपींविरुद्ध दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई एसीबी नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar), अपर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी (Madhav Reddy Addl SP), वाचक, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक अभिषेक पाटील (DySP Abhishek Patil) , एसीबी धुळे पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी (PI Rupali Khandvi), पोलीस हवालदार राजन कदम, पोलीस नाईक संतोष पावरा, पोलीस शिपाई रामदास बारेला, चालक पोलीस शिपाई बडगुजर यांच्या पथकाने केली.

Pune Koregaon Park Crime | मैत्रिणीच्या मित्राकडून तरुणी मारहाण, अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; कोरेगाव पार्क परिसरातील घटना

Related Posts