IMPIMP

Accident News | उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे बस-ट्रकची समोरासमोर धडक; 8 जणांचा जागीच मृत्यू

by nagesh
Accident News | accident truck and passenger bus crash barabanki 8 killed spot

बाराबंकी : सरकारसत्ता ऑनलाइन  Accident News | एक खासगी प्रवासी वाहतूक बस आणि वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (Accident News) झाला. यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बाराबंकीच्या देवा पोलीस ठाणे परीक्षेत्रातील बबुरी गावाजवळ किसान पथ रिंग रोड येथे आज सकाळी हा अपघात घडला असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बस दिल्लीहून बहराइच येथे पर्यटकांना घेऊन निघाली होती. तर ट्रक वाळूची वाहतूक करत होता.
दोन्ही वाहने समोरासमोरून वेगाने येत होती. त्या वेळी अचानक एक म्हैस समोर आडवी आल्याने दोन्ही वाहनचालकांचे नियंत्रण सुटले.
त्यामुळे, दोन्ही गाड्यांची एकमेकांना धडक (Accident News) बसली. हा अपघात इतका भीषण होता की, आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.
प्रवासी बसमधील नागरिकांनी मोठ-मोठ्याने रडायला सुरुवात केली. त्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत बचाव कार्याला सुरुवात केली.
दरम्यान, पोलिसांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून जखमींना तात्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.

 

Web Title : Accident News | accident truck and passenger bus crash barabanki 8 killed spot

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 10 लाखाच्या खंडणीचं प्रकरण : राजेश बजाज, बापू शिंदे यांच्यावर आणखी एक खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल

Ajit Pawar | अजित पवारांशी संबंधीत साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे, उपमुख्यमंत्री म्हणाले…

Rajesh Tope | दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता? राजेश टोपे म्हणाले…

 

Related Posts