IMPIMP

Anil Deshmukh | सलग 13 तासाच्या चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED कडून अटक

by nagesh
Anil Deshmukh Money Laundering Case | ed names anil deshmukh as main accused in the 7000 pages chargesheet filed in the money laundering case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anil Deshmukh | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अनिल देशमुख हे अज्ञातवासात होते. त्याचवेळी त्यांच्यावर १०० कोटी रुपयांचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param bir singh) हेही फरार आहेत. १०० कोटी रुपये वसुलीच्या प्रकरणाबरोबरच बदल्यांमध्ये पैसे घेतल्याचा आरोपही अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर असून त्याबाबतही ईडी चौकशी करीत आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

अनिल देशमुख यांना ईडीने ५ वेळा समन्स बजावले होते. तरीही ते चौकशीला हजर राहिले नाहीत.
गृहमंत्री असताना त्यांनी पोलिसांना दरमहा १०० कोटी रुपये वसुली करण्याचा आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी आरोप केला होता. यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा दावा करुन ईडीने अनिल देशमुख यांच्यावर २१ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या मुंबई, नागपूर व अन्य ठिकाणी अनेकदा छापे मारण्यात आले होते. त्यानंतर ते अज्ञातवासात गेले होते.

अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.

सोमवारी दुपारी बारा वाजता अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे ईडीच्या कार्यालयात गेले.

त्याअगोदर त्यांनी दोन व्हिडिओ ट्विट करुन परमबीरसिंह यांच्यावर आरोप करीत आपली बाजू मांडली होती.
ईडीच्या अधिकार्‍यांकडून दुपारपासून अनिल देशमुख यांची चौकशी सुरु करण्यात आली. त्यानंतर ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार हे देशमुख यांच्या चौकशीसाठी दिल्लीहून मुंबईत दाखल झाले. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या अटकेच्या कारवाईला वेग आला. देशमुख यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे नकारार्थी देत आहेत. ते माहिती लपवित असल्याचा अधिकार्‍यांना संशय आहे. त्यामुळे ईडीने त्यांना अटक करण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्रीनंतर १च्या सुमारास त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीने जाहीर केले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

अनिल देशमुख यांना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात येईल.
त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे.
त्यामुळे त्यांची दिवाळी आता कोठडीत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
नरखेड तालुक्यातील वडविहिरा हे अनिल देशमुख यांचे मुळ गाव.
अनिलबाबू १९९२ मध्ये काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य झाले. नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षही झाले.
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख यांनी बंडाचे निशाण फडकवित आमदार झाले होते.
त्यांनी शिवसेना भाजप युतीच्या सरकारला ३५ अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवून देत कॅबिनेट मंत्रीपद पटकाविले होते. त्यानंतर ते १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते.
अनिल देशमुख यांचे सख्ये चुलत भाऊ रणजित देशमुख यांचा पुत्र आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांचा २०१४ मध्ये पराभव केला होता.
२०१९ मध्ये अनिल देशमुख हे पुन्हा निवडून आले. शरद पवार यांनी त्यांना थेट गृहमंत्री केले होते.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title: Anil Deshmukh | Anil Deshmukh, Maharashtra’s former Home Minister, arrested in money laundering case by Enforcement Directorate

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 52 वर्षाच्या शिक्षकानं 15 वर्षीय मुलीला नेलं टेरेसवर, बलात्कारकरून अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस

Pune News | जनजन दिवाळी ! दिवाळी जनसामान्यांची काँग्रेस पक्षाच्या उपक्रमास प्रारंभ – माजी आमदार मोहन जोशी

Bhusaval-Daund Train | भुसावळ-दौंड मेमू साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

 

Related Posts