IMPIMP

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना मोठा झटका ! न्यायालयाने ईडी कोठडीत केली ‘एवढ्या’ दिवसांची वाढ

by nagesh
Anil Deshmukh | former home minister anil deshmukh remanded ed custody till 15 november 2021 in money laundering case know details

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) 100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money laundering case) अटक करण्यात आली आहे. त्यांची 12 तास चौकशी केल्यानंतर ईडीने (ED) त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपल्याने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत देशमुख यांना 3 दिवसांची ईडी कोठडी (ED custody) सुनावली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान ईडीच्या वकीलांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आणखी तीन दिवसांची कोठडी देण्याची मागणी
केली होती. यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने 15 नोव्हेंबरपर्यत ईडी कोठडी सुनावली. सचिन वाझे (Sachin Vaze) आणि अनिल देशमुख यांची एकत्रित चौकशी करायची आहे. यामुळे ईडीने कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

तर मला आता ईडी कोठडी देऊ नका अशी विनंती अनिल देशमुख यांनी न्यायालयात केली. अनिल देशमुख यांनी म्हटले की, माझा 25 जूनला जबाब नोंदवला गेला. धाडी टाकल्या त्या दरम्यान देखील माझी चौकशी केली गेली. मी स्वत:हून ईडी चौकशीला (Inquiry) आलो. अटक (Arrest) होण्यापूर्वी मी या प्रकरणात आरोपी नव्हतो. आता 10 दिवस माझी कोठडी झालीये. मला खूप प्रश्न विचारले गेलेत. इतकी वेळ माझी चौकशी केली गेली तरी मी चौकशीला सहकार्य करत नाही, असं खोटं सांगितले जात असल्याचे देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले.

 

Web Title: Anil Deshmukh | former home minister anil deshmukh remanded ed custody till 15 november 2021 in money laundering case know details

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | खुशखबर ! सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण, जाणून घ्या आजचे नवीन दर

Retail Direct Scheme | पीएम मोदींनी लाँच केल्या RBI च्या 2 विशेष योजना, सामान्य माणसाला होईल थेट फायदा; जाणून घ्या

SSC – HSC Exam Fee Refund | विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! रद्द झालेल्या 10 वी, 12 वी परीक्षेचे शुल्क परत मिळणार

 

Related Posts