IMPIMP

Retail Direct Scheme | पीएम मोदींनी लाँच केल्या RBI च्या 2 विशेष योजना, सामान्य माणसाला होईल थेट फायदा; जाणून घ्या

by nagesh
Vedanta Foxconn Project | vedanta foxconn deal pm narendra modi not behind foxconn move to gujarat vedanta chairman anil agarwal clarifies

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Retail Direct Scheme | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज एका ऑनलाइन बैठकीत ‘RBI रिटेल डायरेक्ट योजने’चा (Retail Direct Scheme) शुभारंभ केला. ही योजना किरकोळ गुंतवणुकदारांना सरकारी बाँड ऑनलाइन खरेदी करणे आणि विकण्याची परवानगी देते.

याशिवाय एकात्मिक लोकपाल योजनेद्वारे तक्रारी दूर करण्यासाठी RBI नियम बनवू शकते. हे एक पोर्टल, एक ई-मेल आणि एक पत्ता आहे जिथे तक्रारी दाखल करत येतील.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

कॅपिटल मार्केटपर्यंत पोहचणे सोपे

आज लाँचिंगदरम्यान आरबीआय गव्हर्नर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमन (finance minister nirmala sitharaman) सुद्धा उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले की, आज ज्या दोन योजना लाँच केल्या आहेत त्यांच्यामुळे देशात गुंतवणुकीच्या कक्षेचा विस्तार होईल आणि गुंतवणुकदारांना कॅपिटल मार्केटपर्यंत पोहचणे जास्त सोपे आणि सुरक्षित होईल.

ही योजना नवीन उंची देणारी – मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले, अर्थव्यवस्थेत सर्वांच्या भागीदारीला प्रोत्साहित करण्याची जी भावना आहे तिला किरकोळ प्रत्यक्ष योजना नवीन उंची देणारी आहे. आता देशातील एका मोठ्या वर्गाला गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये, देशाच्या संपत्ती निर्मित्तीमध्ये थेट गुंतवणुक करण्यात आणखी सहजता येईल.

 

 

जाणून घ्या काय आहे रिटेल डायरेक्ट स्कीम ?

RBI च्या रिटेल डायरेक्ट स्कीमचा मुख्य उद्देश किरकोळ गुंतवणुकदारांना सरकारी सिक्युरिटीजपर्यंत पोहचणे सोपे व्हावे हा आहे. योजनेंतर्गत रिटेल गुंतवणुकदार (Retail Direct Scheme) केंद्र आणि राज्य सरकारद्वारे जारी कोणत्याही सिक्युरिटजमध्ये थेट गुंतवणुक करू शकतात.

इतकेच नव्हे, ते सहजपणे आरबीआयकडे सरकारी सिक्युरिटीजसाठी खाते उघडू शकतील. यासाठी त्यांच्याकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

जाणून घ्या यामध्ये पैसे लावणे सुरक्षित आहे का?

गुंतवणुकदारांसाठी सरकारी बाँड खुप सुरक्षित मानले जातात. कारण यामध्ये सरकारीची गॅरंटी असते. कंपनीचा बाँड त्याच्या आर्थिक स्थितीच्या हिेशेबाने सुरक्षित असतो. जिथे कंपनीची आर्थिक स्थिती ठिक नसल्यास तिचे बाँड सुरक्षेच्या दृष्टीने चांगले मानले जात नाहीत. अशावेळी येथे गुंतवणूक करणे लाभदायक ठरते. (Retail Direct Scheme)

 

 

किमान 10,000 रुपयांची मर्यादा

RBI च्या स्कीमसाठी गुंतवणुकदार 5 कोटीपर्यंतचा बाँड खरेदी करू शकतात.
यापेक्षा कमीचे बाँड सुद्धा खरेदी करता येतात.
या सेगमेंटमध्ये रिझर्व्ह बँकेने किरकोळ गुंतवणुकदारांसाठी 10,000 रुपयांची मर्यादा ठरवली आहे
ज्या दरावर किमान बाँडची खरेदी केली जाऊ शकते. आरबीआयच्या हे बाँड मॅच्युरिटीपूर्वी विकता येऊ शकतात.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title: Retail Direct Scheme | pm modi launches rbi retail direct here how it works details here

 

हे देखील वाचा :

SSC – HSC Exam Fee Refund | विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! रद्द झालेल्या 10 वी, 12 वी परीक्षेचे शुल्क परत मिळणार

Pune News | सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कॅनॉललगतच्या रस्त्याचे काम तातडीने करा, स्वीकृत सदस्य अभिजित बारवकर यांची मागणी

Earn Money | सरकारकडून 90% सबसिडी घेऊन सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहिना होईल 2 लाख रुपयांपर्यंत नफा

 

Related Posts