IMPIMP

SSC – HSC Exam Fee Refund | विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! रद्द झालेल्या 10 वी, 12 वी परीक्षेचे शुल्क परत मिळणार

by nagesh
HSC - SSC Exam 2023 | ssc-hse exams 2023 exam shedule 10th 12th exam schedule announced check here in details

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  SSC – HSC Exam Fee Refund | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद होती. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा देखील रद्द केल्या होत्या. दरम्यान, त्यावेळी 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनी भरेलेली परीक्षा फि (SSC – HSC Exam Fee Refund) रिटर्न मिळणार आहे. यामुळे या विद्यार्थांना शिक्षण मंडळाकडून दिलासा मिळाला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) यांच्या आदेशानुसार मंडळाने सन 2021 मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी)
व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12वी) चे परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा देण्यात येणार आहे.
याबाबत शिक्षण मंडळाने (Maharashtra State board of secondary and higher secondary education Pune) एक परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे.

 

दरम्यान, माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांचा तपशील दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजीपासून 10 वी आणि 12 वी साठी mahasscboard.in तर,
इयत्ता 10 वी साठी https://feerefund.mh-ssc.ac.in आणि इयत्ता 12 वीसाठी https://feerefund.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरुन
लिंकद्वारे नोंदविणे आवश्यक असल्याचं सांगितलं (SSC – HSC Exam Fee Refund) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

12 वी चे 12 नोव्हेंबरपासून परीक्षेचे अर्ज स्वीकारले जाणार –

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा
म्हणजेच 12 वीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 12 नोव्हेंबरपासून परीक्षेचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
बारावीच्या विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत असं सांगण्यात आलं आहे.

 

Web Title : SSC – HSC Exam Fee Refund | ssc hsc students will get refund of exam fees after canceled exams in 2021 due to covid 19 read full details

 

हे देखील वाचा :

Pune News | सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कॅनॉललगतच्या रस्त्याचे काम तातडीने करा, स्वीकृत सदस्य अभिजित बारवकर यांची मागणी

Pune Crime | भाजप नगरसेवक धनराज घोगरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला; जाणून घ्या कोर्टात काय झाला युक्तीवाद

Earn Money | सरकारकडून 90% सबसिडी घेऊन सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहिना होईल 2 लाख रुपयांपर्यंत नफा

 

Related Posts