IMPIMP

Anti Corruption Nashik | लाचखोर महिला शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकारांकडे कोटयावधीची संपत्ती, जाणून घ्या

by nagesh
Anti Corruption Nashik | acb arrest corrupt woman education officer dr vaishali zankar

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Nashik | नाशिक (येथील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर झनकर (Education Officer Dr. Vaishali Veer zankar) यांच्यासह त्यांचा शासकीय वाहनचालक यांना 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti corruption bureau) बुधवारी (11 ऑगस्ट) रोजी रंगेहात पकडले. यांनतर तपास पथकाने (Anti Corruption Nashik) झनकर यांच्या घराची घेतल्याने एक धक्कादायक माहिती समोर आलीय. शिक्षणाधिकारी झनकर यांच्या नावावर जवळजवळ ३ एक्कर जमीन व ४ फ्लॅट अशी स्थावर मालमत्ता सापडली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

तक्रारदार यांची शिक्षण संस्था असून त्यांच्या शाळांना शासनाकडून 20 टक्के अनुदान मंजूर झाले होते. या मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे संस्थेस नियमित वेतन सुरु करण्याच्या ऑर्डरची मागणी संस्थेकडून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून करण्यात आली. यावेळी संस्थेकडे सुमारे 9 लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली. यावेळी तक्रारदार यांनी तडजोडीअंती 8 लाख रुपये देण्याचे कबूल केले. या प्रकरणातील इतर 2 संशयित शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले (Dnyaneshwar Yeole) आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते (Pankaj Dashpute) या दोघांना जिल्हा कोर्टात हजर केले असता त्यांना  नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं 13 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी ACB पथकाने झनकर (Dr. Vaishali Veer Jhankar) यांना ताब्यात
घेतले. मात्र, सूर्यास्त झाल्यानंतर महिलेस अटक न करण्याचा नियम असल्याने त्यांना बुधवारी हजर व्हा.
अशी हमी देऊन घरी जाण्यास सांगितले. मात्र दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात (Police station) वीर या
हजर झाल्याचं नाहीत.त्या पसार झाल्या. या दरम्यान, झनकर यांच्या घराचा तपास पथकाने केला असता.
अनेक माहिती समोर आलीय. तपास अधिकाऱ्यांनी SBI बँक ऑफ बडोदा, सिटी युनियन बँक, PNG
बँकेसह अन्य बँकांचे पासबुक जप्त केलेत. तसेच, अधिकाऱ्यानी शासकीय वाहनचालक येवले, प्राथमिक
शाळेतील शिक्षक दशपुते यांच्या देखील घराची झडती घेतली.

 

झनकर यांच्या नावावरील संपत्ती –

डॉ. वैशाली वीर झनकर (Dr. Vaishali Veer Jhankar) यांच्या नावावर शहरातील शिवाजीनगर भागात,
गंगापूररोड, मुरबाड, गंधारे कल्याण असे प्रत्येकी एक याप्रमाणे चार फ्लॅट आहेत. सिन्नरमध्ये 0.57 गुंठे,
कल्याण-मिलिंदनगरमध्ये 31.70 गुंठे, 10.8 गुंठे, 40.80 गुंठे, 13.10 गुंठे तर सिन्नर येथे 0.56 गुंठे, 3.41 गुंठे, 22.70 गुंठे, अशी एकूण सुमारे 123.64 गुंठे अर्थात 3 एकर अशी स्थावर मालमत्ता आढळून आलीय.
40 हजारांची रोख रक्कम आढळली असून 1 होंडा सिटी कार, 1ॲक्टिवा दुचाकी अशी वाहने आहेत.

 

Web Title : Anti Corrupation nashik woman education officer bribe case dr vaishali veer zankar property three acres of land and four flats

 

हे देखील वाचा :

Maharashtra Corona | पुण्यासह ‘या’ 7 जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढवली, आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यापेक्षा अधिक

Customs Department Pune Recruitment-2021 | पुणे सीमाशुल्क विभागात अनुभवी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Government | राज्यातील खासगी कार्यालये ‘या’ अटींवर 24 तास सुरु राहणार

 

Related Posts