IMPIMP

Anti Corruption Pune | लाचखोर सहायक पोलिस निरीक्षकासह त्याच्या साथीदाराला 5 दिवसांची पोलिस कोठडी

by nagesh
Anti Corruption Pune | His accomplice, along with a corrupt assistant police inspector, was remanded in police custody for five days

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Pune | फसवणुकीच्या गुन्ह्यात जामिनासाठी मदत करण्यासाठी एकाकडून एक लाख रुपयांची लाच (Anti Corruption Pune) घेणाऱ्या विमानतळ पोलिस ठाण्यातील (Vimannagar Police) सहायक पोलिस निरीक्षकासह त्याच्या साथीदाराला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जामीन मिळवून देण्यासाठी पोलिसाने एकूण पाच लाखांची मागणी केली होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Pune) बुधवारी ही कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल अशोक पाटील API Rahul Ashok Patil (वय ३२, रा. वडगाव शिंदे रस्ता) आणि संतोष भाऊराव खांदवे Santosh Bhaurao Khandve (वय ४६, रा. लोहगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदाराच्या वडिलांचा जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यावसायिक कारणातून त्यांच्या वडिलांविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या वडिलांना अटक झाली असून ते पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणात जामीन मिळावा, यासाठी तक्रारदार यांनी पाटील यांच्याशी संपर्क केला होता.

 

जामिनाला विरोध न करण्यासाठी आणि अनुकूल अभिप्रायासाठी पाटील यांनी तक्रारदाराकडे पाच लाखांची लाच मागितली होती.
तडजोडीत तक्रारदाराने तीन लाखांची लाच देण्याचे मान्य केले.
लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाखांची मागणी करण्यात आली होती.
पाटील यांनी त्यांचा ओळखीचे खांदवे याला तक्रारदाराकडून लाच घेण्यासाठी बुधवारी लोहगाव परिसरात पाठविले.
दरम्यान, या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून खांदवेला एक लाखांची लाच घेताना पकडले.

 

 

Web Titel :- Anti Corruption Pune | His accomplice, along with a corrupt assistant police inspector, was remanded in police custody for five days

 

हे देखील वाचा :

MP Bhavana Gavali | खा. भावना गवळींकडून जिवाला धोका; ‘या’ शिवसेना नेत्याचा खळबळजनक आरोप

Mansukh Hiren Murder Case | ‘त्या’ दिवशी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंहांच्या केबिनमध्ये होते प्रदीप शर्मा

Pune Ganeshotsav | गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पुण्यात 10 दिवस जमावबंदी लागू

 

Related Posts