IMPIMP

Anti-Corruption Sangli | 30 हजार रुपयाची लाच घेताना महिला अधिकार्‍यासह एक जण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन Anti-Corruption Sangli | तासगांव तालुक्यात 30 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वनविभागाच्या वनक्षेत्रपालासह ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Sangli) रंगेहाथ पकडले आहे. सदरची कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी केली आहे. याप्रकरणी वनक्षेत्रपाल अर्थात वनपरिक्षेत्र अधिकारी कौशल्या हणमंत भोसले (वय, 32, रा. तासगाव) आणि कार्यालयातील ऑपरेटर श्रीकांत तुकाराम शिंदे (वय 43, रा. मणेराजुरी, ता. तासगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आलॆ आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत माहिती अशी, तक्रारदार यांचा लाकूड वाहतुकीचा ट्रक वनविभागाने (Forest Department) एक महिन्यापूर्वी पकडला होता.
तो सोडून देण्यासाठी वनक्षेत्रपाल कौशल्या भोसले (Forester Kaushalya Bhosle) यांनी 30 हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराने सांगलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केली.
विभागाने तक्रारीनुसार तासगाव शहरात सापळा रचला.
गुरुवारी (26 ऑगस्ट) रोजी तक्रारदारास वनक्षेत्रपाल भोसले यांच्याकडे पाठविले.
भोसले यांनी “तुझा ट्रक सोडायचा असेल तर 30 हजार रुपये द्यावे लागतील” असे सांगितले.

दरम्यान, या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पुन्हा तक्रारदाराला 30 हजार रुपये घेऊन पाठवण्यात आले. त्यावेळी वनक्षेत्रपाल भोसले यांनी ती रक्कम वन विभाग कार्यालयातील ऑपरेटर श्रीकांत शिंदे (Operator Shrikant Shinde) यांच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानुसार तक्रारदार रक्कम घेऊन शिंदे यांच्याकडे गेला.
ती रक्कम स्विकारत असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
तसेच वनक्षेत्रपाल कौशल्या भोसले यांनाही ताब्यात घेतले.
या दोघांवर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.
दरम्यान, पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, पीआय गुरुदत्त मोरे, पोलिस अंमलदार अविनाश सागर,
धनंजय खाडे, संजय संकपाळ, सलीम मकानदार, अजय पाटील, राधिका माने, विना जाधव,
श्रीपती देशपांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title : Anti-Corruption Sangli | Anti-Corruption trap on Forest Range Officer Kaushalya Hanmant Bhosale and operator Shrikant Tukaram Shinde

 

हे देखील वाचा :

Pune Court | हॉटेल चालकांकडून खंडणी वसुल करणार्‍या पोलिस उपनिरीक्षकाला जामीन

Army Recruitment Scam | पेपरफुटी प्रकरणी 2 मेजरसह आठ जणांचा जामीन फेटाळला; जाणून घ्या प्रकरण

Modi Government Schemes | 8वी पासपासून 12वी मधून शिक्षण सोडलेल्यांसाठी उपयोगी आहेत मोदी सरकारच्या ‘या’ योजना, राहणार नाही बेरोजगार; जाणून घ्या

 

Related Posts