IMPIMP

Anti Corruption | 1.20 लाखाची लाच घेताना तहसीलदार आणि शिपाई अँटी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन बांधकाम कंपनीने घेतलेल्या जमिनीबाबतच्या हरकतींवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी तहसीलदार आणि शिपायाला एक लाख वीस हजार रुपयांची लाच घेताना (Accepting Bribe) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून (Anti Corruption) अटक (Arrest) केली. ठाणे लाचलुपचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption, Thane) ही कारवाई सोमवार (दि.30) दुपारी पावणे एकच्या सुमारास कल्याण तहसिल कार्यालयात (Kalyan Tehsil Office) केली. या कारवाईमुळे तहसिल कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

 

तहसिलदार दिपक मारुतीराव आकडे Deepak Marutirao Aakde (वय – 45, रा. हारमोनी बिल्डिंग, नं.6,रुम नं. 401, खारघर सेक्टर नं.6, नवी
मुंबई), शिपाई मनोहर ‍दत्तात्रय हरड (वय – 42 रा. बिल्डिंग नं.504, अंबिका पॅलेस सोसायटी, सावरकरनगर, टिटवाळा पुर्व) असे लाच स्वीकारताना
रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 50 वर्षीय व्यक्तीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 26 ऑगस्ट रोजी तक्रार दिली आहे.

 

तक्रारदार यांच्या बांधकाम कंपनीने (construction company) कल्याण तालुक्यातील मौजे वरप येथे जमीन खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या जमिनीबाबतच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी तहसीलदार दिपक आकडे याने तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने 26 ऑगस्ट रोजी पडताळणी केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पथकाने केलेल्या पडताळणीदरम्यान दीपक आकडे याने स्वत:साठी 1 लाख आणि शिपाई बाबु उर्फ मनोहर हरड याने स्वत: साठी व स्टाफसाठी 20 हजार रुपयांची लाच मागितली. तसेच दिपक आकडे याने लाचेची एक लाख रुपयांची रक्कम शिपाई हरड याच्याकडे देण्यास सांगितले. त्यावरुन आज तहसिल कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यावेळी शिपाई बाबु हरड याने स्वत:साठी 20 हजार आणि तहसिलदार आकडे याच्यासाठी 1 लाख अशी एकूण 1 लाख 20 हजार रुपयाची लाच घेताना पथकाने रंगेहाथ पकडले.

 

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले (SP Dr. Panjabrao Ugle) , अपर पोलीस अधीक्षक निलिमा कुलकर्णी (Additional
Superintendent of Police Nilima Kulkarni) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे (Police Inspector Santosh Shewale), पोलीस नाईक प्रशांत घोलप, महिला पोलीस नाईक जयश्री पवार, पोलीस शिपाई विनोद जाधव, पद्माकर पारधी, चालक पोलीस हवालदार महाले यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Anti Corruption | Tehsildar and peon caught in anti-corruption scam while accepting bribe of Rs 1.20 lakh

 

हे देखील वाचा :

Pune Water Supply | गुरुवारी संपुर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

Amravati Crime | दुर्देवी ! एकाच कुटुंबातील तब्बल 11 जणांना विषबाधा; 7 वर्षीय मुलासह आई-वडिलांचा मृत्यू

BJP Protest | भाजपचे राज्यव्यापी शंखनाद आंदोलन; ‘विठ्ठल मंदिरात घुसणाऱ्या BJP कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात धुमश्‍चक्री

 

Related Posts