IMPIMP

Cyber Crime | सावधान ! ओमिक्रॉनच्या नावाखाली होतेय फसवणूक, गृह मंत्रालयाकडून गाईडलाईन जारी

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | Two and a half lakh rupees missing from bank account without sharing any information, type in Pimpri Chinchwad

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याच काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार (Cyber Crime) ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron Covid Variant) नावाखाली नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गृह मंत्रालयाने सायबर गुन्ह्यांबाबत (Cyber Crime) एक गाईडलाईन जारी (Guidelines Issued) केली आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने सायबर भामटे ओमिक्रॉनच्या मोफत चाचणीच्या (Omicron Free Test) नावाखाली लोकांची फसवणूक करत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गृह मंत्रालयाच्या सायबर आणि माहिती सुरक्षा विभागाने (Cyber and Information Security Department) एक सूचना जारी केली आहे. यात
म्हटले की, आरोग्य संकटावर लक्ष केंद्रित केल्यामुळे सायबर सुरक्षेत दुर्लक्ष केले जात आहे. याचाच फायदा सायबर गुन्हेगार (Cyber Crime) घेत आहे.
सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वेगवगळ्या मार्गाचा वापर करत आहे. सध्या ओमिक्रॉन प्रकाराबाबत सायबर गुन्हे
वेगाने वाढत आहेत. त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता सायबर गुन्हेगार नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत.

गृह मंत्रालयाने पुढे म्हटले की, ओमिक्रॉननची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी संदर्भात ई-मेल पाठवले जात आहेत. यामध्ये लोकांचा डेटा चोरणाऱ्या लिंक्स आणि फाईल्स आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सरकारी आणि खासगी आरोग्य सेवांच्या नावाचा वापर करुन जनतेची फसवणूक (Cheating) केली जात आहे. आरटीपीसीआर चाचणीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करुन लोकांना ठगांनी तयार केलेल्या बनावट वेबसाईटवर नेले जाते. जी सरकारी किंवा खासगी आरोग्य सेवांच्या वेबसाईटसारखीच दिसते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सायबर गुन्हेगार लोकांची वैयक्तिक माहिती (Personal Information) आणि बँक तपशील (Bank Details) मिळवतात आणि लोकांची फसवणूक करतात.
वेबसाईट खरी आहे की बनावट हे जाणून घेण्यासाठी सरकारने लोकांना डोमेन नाव आणि यूआरएल तपासण्याचा सल्ला दिला आहे.
अशा कोणत्याही घटनेची माहिती cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

 

 

Web Title : Cyber Crime | be careful this is how the fraud started under the name of omicron

 

हे देखील वाचा :

PPF Investment | नवीन वर्षात सुरू करा बचत आणि सुरक्षित गुंतवणूक, दरमहिना 1000 रु. जमा करून बनवा 12 लाखाचा फंड, जाणून घ्या पूर्ण योजना

Life Certificate | पेंशनर्सला मोठा दिलासा ! आता तुम्ही ‘या’ तारखेपर्यंत जमा करू शकता हयातीचा दाखला, जाणून घ्या सविस्तर

Restrictions in Maharashtra | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे लॉकडाऊनबाबत मोठं विधान, म्हणाले – ‘सध्या…’

 

Related Posts