IMPIMP

Maharashtra Police | हातभट्टी तस्कराकडून पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

बार्शी : सरकारसत्ता ऑनलाइन  – Maharashtra Police | अवैध हातभट्टी दारुची तस्करी (liquor agent) करणाऱ्यांकडून नाकाबंदीवर तैनात असलेल्या पोलीस (Maharashtra Police) कर्मचाऱ्याच्या अंगावर कार घालून जीवे ठार (attempted murder) मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील (Solapur Crime) बार्शी येथे घडली आहे. ही घटना रविवारी (दि.29) रात्री साडेदहाच्या सुमारास बार्शी-कुर्डुवाडी रोडवर (Barshi-Kurduwadi Road) घडली आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे.

राम देवीदास जाधव (वय-40) मुकुंद श्रीकुंभ जाधव (वय-25), अजय शिवाजी राठोड (सर्व रा. बक्षीहिप्परगा तांडा, ता. उत्तर सोलापूर) व अनोळखी अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राम जाधव आणि मुकुंद जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धनराज वेवाण (Dhanraj Vevan) यांनी फिर्याद दिली आहे.

बक्षीहिप्परगा तांडा येथील हातभट्टी दारुच्या ट्यूब घेऊन बोलेरो जीप (Bolero Jeep) बार्शीच्या दिशेने येत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे (API Shivaji Jayapatre) यांनी धनराज वेवाण यांना दिली. त्यानुसार वेवाण यांनी पानगाव येथे नाकाबंदी केली. त्यावेळी सोलापूरच्या दिशेने एक भरधाव वेगात बोलेरो गाडी आली. नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी गाडीला थांबण्याचा इशारा केला परंतु चालकाने गाडी न थांबवता तसाच निघून गेला. पोलिसांनी त्याचा बार्शी पोस्ट चौकापर्यंत (Barshi Post Chowk) पाठलाग केला. चालकाने जीप कुर्डुवाडीच्या दिशेने वळून बायपास चौकातून लातूर बायपासकडे जीप वळवली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

त्यामुळे पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी कुर्डुवाडी-बार्शी मार्गावरील तालुका पोलीस ठाण्याच्या अमंलदरांना फोन करुन रोडवर नाकाबंदी करण्यास सांगितले. पोलीस अमंलदार शेलार यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, सुरेश बिरकले, शिंदे, महेश डोंगरे, आप्पा लोहार यांच्या मदतीने बॅरिकेड्स व ठाणे अमंलदार यांची स्विफ्ट कार आडवी लावून चालकाला थांबण्याचा इशारा केला. परंतु बोलेरो चालकाने गाडी न थांबवता शेलर यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

शेलार यांनी समयसूचकता बाळगून बाजूला उडी घेत आपला जीव वाचवला.
मात्र, बोलेरो चालकाने स्विफ्ट कारला धडक दिली.
या धडकेनंतर गाडी रस्त्याच्या कडेला अडकल्याने गाडीतील चालक व इतर तिघे अंधाराचा फायदा घेऊ पळून जाऊ लागले.
मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन दोघांना पकडले तर त्यांचे इतर दोन साथिदार फरार झाले.
पोलिसांनी बोलेरोमधून 60 हजार 500 रुपयांची हातभट्टीची दारु जप्त केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत.

 

Web Title : Maharashtra Police | Attempt to kill a police officer of solapur rural by hand furnace smuggler in barshi

 

हे देखील वाचा :

West Nile Virus | नवीन संकट ! कोरोना दरम्यानच वेस्ट नाईल व्हायरसचा धोका वाढला, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचावाचे उपाय

Thane Crime | धक्कादायक ! अनिधकृत फेरीवाल्याचा पालिका सहाय्यक आयुक्तांवर चाकूने हल्ला, हाताची 3 बोटं छाटली

Ahmadnagar Police Transfer | नगर जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल, 9 पोलीस निरीक्षकांसह 46 अधिकाऱ्यांच्या बदल्या

 

 

 

Related Posts