IMPIMP

Mumbai Crime | बनावट NCB अधिकारी बनून केलं Blackmail, अभिनेत्रीची आत्महत्या

by nagesh
Pune Crime | From the old controversy, he sent obscene messages in the name of the woman and slandered her for having links with terrorists

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai Crime | ड्रग्ज घेतल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आल्यावर पोलिसांनी मागितलेली खंडणीची रक्कम (Ransom Amount) जमा करणं शक्य नसल्याने दबावातून एका अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची (Actress Commits Suicide) धक्कादायक घटना मुंबईत (Mumbai Crime) उघडकीस आले आहे. याहून अधिक धक्कादायक म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती ते तोतया अधिकारी (Fake NCB Officer) असल्याचे तपासात समोर आले आहे. आपण अंमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी असल्याचा बनाव रचून दोघांनी एका पार्टीवर छापा टाकला होता. त्यावेळी अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या एका तरुणीला ताब्यात घेतले होते. त्यानंतर या प्रकरणाची सेटलमेंट करण्याची तयारी दाखवली होती.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

नेमकं काय घडलं?

मुंबईतील (Mumbai Crime) जोगेश्वरी भागात भाड्याच्या घरात राहणारी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये (Bhojpuri Movies) काम करणारी एक अभिनेत्री काही दिवसांपूर्वी एका पार्टीला गेली होती. त्यावेळी तिथं अचानक दोन अधिकारी आले आणि त्यांनी धाड घातली. या अभिनेत्रीसह इतर काहीजणांना अंमली पदार्थ घेताना रंगेहाथ अटक (Arrest) केल्याचे सांगत कारवाई करण्याची तंबी दिली.

अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यामुळे आपले करिअर बरबाद होईल असे वाटल्याने तरुणीने त्यांच्यासोबत सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला. बनावट पोलिसही याच संधीची वाट पाहत होते. त्यांनी थोडे आढेवेढे घेऊन शेवटी सेटलमेंटची (Settlement) तयारी दाखवली. सुरुवातीला 40 लाख रुपये मागितले. त्यानंतर तडजोडीत 20 लाख रुपये देण्याचे निश्चित झाले.

 

तरुणीला आलं टेन्शन

मध्यमवर्गीय कुटुंबातील या तरुणीला एवढी मोठी रक्कम कशी जमा करावी याचे टेन्शन आले होते. पैसे जमा करण्याच्या दबाखालीच तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती तिच्या मैत्रिणीने दिली. याप्रकरणी पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुरज परदेशी Suraj Pardeshi (वय-32) आणि प्रवीण वाळिंबे Praveen Walimbe (वय-28) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title : Mumbai Crime | an actress commits suicide after bogus ncb officers threatens her mumbai crime

 

हे देखील वाचा :

Driving License | ‘ड्रायव्हिंग लायसन्स’साठी टेस्टचे झंझट संपले ! ‘या’ एका सर्टिफिकेटवर बनू शकते ‘DL’, जाणून घ्या नवीन नियम

Gold Silver Price Today | महिन्याच्या अखेर सोन्या-चांदीचे दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime | क्लिप पाहून 12 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणार्‍या 5 जणांकडून 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार; पुण्यातील घटना

 

Related Posts