IMPIMP

Mumbai Crime | खळबळजनक ! गुंगीचं औषध देऊन पत्नीवर सामूहिक बलात्कार, पतीसह मित्राला अटक

by nagesh
Pune Crime | College peon arrested for molesting college girl

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai Crime | पत्नीच्या कोल्डड्रिंकमध्ये (cold drink) गुंगीचे औषध मिसळून पतीने आणि त्याच्या मित्राने सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सामूहिक बलात्काराची (Mumbai Crime) ही घटना मुंबईच्या अंबोली पोलीस ठाण्याच्या (Amboli Police Station) हद्दीत शुक्रवारी (26 नोव्हेंबर) घडली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिच्या पतीसह त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन त्यांना अटक (Arrest) केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने वाढदिवसाची पार्टीसाठी (birthday party) जायचे असल्याचे सांगून पत्नीला मित्राच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी पीडित महिलेला कोल्डड्रिंक प्यायला दिले. कोल्डड्रिंक पिल्यानंतर महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर काही तासांनी शुद्धीवर आली. त्यावेळी महिलेच्या अंगावरील कपडे अस्ताव्यस्त झाले होते. त्यावेळी तिच्यासोबत घडलेला प्रकार लक्षात आला. यानंतर पीडितेने आपल्या पतीला जाब विचारला. त्यावेळी त्याने या प्रकरणाची कुठेही वाच्चता केल्यास ठार मारण्याची धमकी (Death threats) दिली.

 

यानंतर घरी आल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. तसेच महिलेने तिच्या सोबत घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला.
त्यानंतर पीडितेच्या घरच्यांनी दुसऱ्या दिवशी शनिवारी (27 नोव्हेंबर) अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी पीडितेच्या पतीसह त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल (Mumbai Crime) करुन अटक केली.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अंबोली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Mumbai Crime | mumbai crime husband and his friend arrested for gang raping wife

 

हे देखील वाचा :

Pune News | बांग्लादेश युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळविलेल्या विजयाच्या 50 व्या वर्षानिमित्त ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाचे आयोजन – आबा बागुल

Gold Price Today | सोने झाले स्वस्त, चांदीच्या किमतीत सुद्धा घसरण; जाणून घ्या आजचे नवीन दर

Vote without Voter ID | तुमच्याकडे नसेल मतदार ओळखपत्र तरी सुद्धा टाकू शकता मत; जाणून घ्या पद्धत

 

Related Posts