IMPIMP

Gold Price Today | सोने झाले स्वस्त, चांदीच्या किमतीत सुद्धा घसरण; जाणून घ्या आजचे नवीन दर

by nagesh
check gold silver latest price in india 1 december 2021 check today 10 gram gold price 22 carat gold price 24 carat gold rate in your city

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात जबरदस्त घसरण दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात सोने (Gold Price Today) 302 रुपये स्वस्त झाले. राष्ट्रीय राजधानीत सोने बुधवारी 302 रुपयांच्या घसरणीसह 46,848 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मागील व्यवहारात सोने 47,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. एचडीएफसी सिक्युरिटजने ही माहिती दिली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

चांदीच्या दरात 81 रुपयांची घसरण

तर, चांदीची किंमत (Silver Price Today) सुद्धा 81 रुपयांच्या घसरणीसह 61,031 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली. मागील व्यवहारात चांदीचा दर 61,112 रुपये प्रति किलोग्रॅमवर होता.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या

ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : check gold silver latest price in india 1 december 2021 check today 10 gram gold price 22 carat gold price 24 carat gold rate in your city

हे देखील वाचा :

Vote without Voter ID | तुमच्याकडे नसेल मतदार ओळखपत्र तरी सुद्धा टाकू शकता मत; जाणून घ्या पद्धत

Astrological Medical Center | ‘या’ ठिकाणी सरकारी रूग्णालयात देशातील पहिले ज्योतिष वैद्यकीय केंद्र ! जन्मकुंडली, हस्तरेषा आणि राशिफळ पाहून आजारावर उपचार

Raigad Fort | 7 डिसेंबरपर्यंत रायगडावर पर्यटकांना प्रवेश बंदी; रायगड-अलिबाग पोलीसांची माहिती

Related Posts