IMPIMP

Nagpur Crime | दोस्त दोस्त ना रहा ! रोज दारूसाठी तगादा लावणाऱ्या मित्राचा मित्रानेच काढला काटा

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन नागपूर (Nagpur Crime) जिल्ह्यातील एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. व्यसनाधीन मित्र दारू पाजण्यासाठी त्रास देत असल्याकारणाने तिघांनी मिळून त्या व्यसनाधीन मित्राची हत्या (Murder) केली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या दरम्यान घडली आहे. शुभम आनंद तिलघरे (वय, ३०, रा. वाघधरा) असं मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेचा प्रकार (Nagpur Crime) काल (गुरुवारी) उघडकीस आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मृत शुभम तिलघरे (Shubham Tilghare) याला दारू आणि गांजाचे अधिक व्यसन होते. तो त्याच्या मित्रांना सतत दारू पाजण्यासाठी त्रास देत होता.
कधीकधी हिंसक होऊन मारहाण करत धमकी देखील देत होता.
अशा प्रकारच्या त्रासाला त्याचे सर्वच मित्र वैतागले होते.
दिवसभर मेहनत करून पैका मिळवायचा आणि शुभवर का खर्च करायचा? असं त्या मित्रांना वाटत होतं. त्याचा एकदाच छडा लावायला हवा.
असं वाटायचं. मात्र त्या सर्व मित्रांपैकी आरोपी नीलेश उर्फ गजनी शहा (Nilesh/Gajani Shah),
अरून जसवंत सिंग (Arun Jaswant Singh) आणि बबलू रामाधर सलोडिया (Bablu Ramadhar Salodia) या तिघांनी शुभम तिलघरेला संपवण्याचा कट रचला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

दरम्यान, नेहमीप्रमाणे शूभम बुधवारी रात्रीच्या दरम्यान आरोपींच्या मागे दारूसाठी तगादा लावला.
आरोपींनी त्याला राजीवनगरमधील दारूच्या भट्टीत दारू पाजली.
नंतर शूभमला एका पडक्या शाळेच्या ओसाड परिसरात नेले.
आणि आरोपींनी शूभमवर चाकूचे वार केले. त्याच्यावर वार करून ठार मारले.
गुरुवारी सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला.

दरम्यान, याबाबत माहिती समजताच एमआयडीसीचे ठाणेदार उमेश बेसरकर (Thanedar Umesh Besarkar) यांनी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस उपायुक्त सारंग आवाड (DCP Sarang Awad) यांनीही भेट देऊन माहिती जाणून घेतली.
शूभमला रात्री आरोपी नीलेश, अरूण आणि बबलू या तिघांनी सोबत नेले होते, ही माहिती कळताच पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन गुरुवारी सायंकाळी त्यांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, त्याला धाक दाखवून त्याचा नेहमीचा त्रास संपवण्याचा आरोपींचा उद्देश होता.
नंतर मात्र त्याला जिवंत सोडले तर तो नशेसाठी आपलाच कुणाचा जीव घेईल, असं आरोपींना वाटले.
म्हणून त्यांनी त्याचा खून (Murder) केला.

 

Web Title : Nagpur Crime | nagpur murder news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | तोतया वकिल दाम्पत्याने बनावट रजिस्टेशन करुन केली व्यावसायिकाची 13 लाखांची फसवणूक

Police Transfer | ‘बिग बी’ अमिताभच्या सुरक्षेत असलेल्या पोलिसाची वर्षाला दीड कोटीची कमाई, तडकाफडकी बदली; जाणून घ्या प्रकरण

Mysuru Rape Case | बलात्कारप्रकरणी मंत्र्याचा अजब सवाल; म्हणाले – ‘सुर्यास्तानंतर ती तिथे गेलीच का?’

 

Related Posts